गरजूंसाठी कम्युनिटी किचन उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:12 AM2021-04-22T04:12:07+5:302021-04-22T04:12:07+5:30

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिव्यांग, गरजू व हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचीही परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा लोकांच्या पोटात ...

Community kitchen suitable for the needy | गरजूंसाठी कम्युनिटी किचन उपयुक्त

गरजूंसाठी कम्युनिटी किचन उपयुक्त

Next

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिव्यांग, गरजू व हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचीही परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा लोकांच्या पोटात दोन घास जावेत, या सामाजिक भावनेतून दानशूर व्यक्ती व संस्था चालवत असलेले कम्युनिटी किचन्स अतिशय उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिकाई) पुणे यांच्या पुढाकारातून उद्योजक दानेश शहा परिवाराच्या सह्योगाने व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने अन्नसुरक्षा विमा (फूड इन्शुरन्स) योजनेअंतर्गत, दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना फूड पॅकेट्स, रोगप्रतिकार शक्तीवर्धक औषधे, मास्क आदी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अन्न शिजवण्यासाठी मॉडर्न महाविद्यालयात उभारलेल्या कम्युनिटी किचनला बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, रघुनाथ येमूल गुरुजी, दानेश शहा, डॉ़ निवेदिता एकबोट आदी उपस्थित होते़

पाटील म्हणाले की, संचारबंदी व अन्य कडक निर्बंध असल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारकडून अशा लोकांना कोणताही दिलासा दिला गेलेला नाही. शिवभोजन थाळी नेमकी किती जणांपर्यंत पोहोचते, याबाबत साशंकता आहे. पण या गरजू लोकांना दोन वेळचे अन्न, दूध, फळे, औषधे व मास्क पुरविण्याचे हे स्वयंसेवी संस्थांचे व दानशूरांचे काम कौतुकास्पद आहे. लॉकडाऊन झालाच, तर दानशूरांनी पुढे येऊन अशा कम्युनिटी किचन्सची उभारणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले़

Web Title: Community kitchen suitable for the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.