'सामान्यांच्या कराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी...' पुणे शहराच्या विदृपीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध
By निलेश राऊत | Updated: March 9, 2024 14:52 IST2024-03-09T14:48:48+5:302024-03-09T14:52:44+5:30
सामान्यांच्या कराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला.....

'सामान्यांच्या कराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी...' पुणे शहराच्या विदृपीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध
पुणे : भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असल्याने, जनतेसमोर विकासाचा पाढा वाचायला हवा होता. मात्र दहा वर्षे सत्ता उपभोगूनही विकासाची पाटी कोरीच असल्याने भाजपाला निवडणुकीत मते मागण्यासाठी, पुणे शहर रंगवून विद्रूप करण्यापलीकडे गत्यंतर उरले नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने करण्यात आली. सामान्यांच्या कराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला.
पुणे शहरात भाजपकडून होणाऱ्या भिंती रंगविण्याविरोधात पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मित्र मंडळ चौक पर्वती येथे शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी जगताप म्हणाले, डोक्यावर अपयश घेऊन लोकांसमोर मतं मागायला भाजपला लाज वाटते म्हणून त्यांच्याकडून "दिवार लेखन" अभियान राबवत शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या घोषणा रंगवून सुंदर पुणे शहर विद्रूप करण्याचे उद्योग सुरू केले असल्याचा आरोप त्यांनी केला.