शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त बदलाच्या हालचाली सुरू

By admin | Updated: April 15, 2017 03:52 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. आयुक्त नागरिकांच्या प्रश्नांना वेळ देत नसल्याचा ठपका ठेवून त्यांची बदली करण्याच्या हालचाली सुरू आहेत. येत्या महिनाभरात ही बदली होणार आहे. त्यांच्या जागी कोणास? आणायचे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांना पिंपरीत पाठविले होते. वाघमारे यांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या कामांना चाप लावण्याचे काम केले होते. महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली आहे. आयुक्तांना पदोन्नती काही महिन्यांपूर्वीच मिळाली आहे. तसेच कौटुंबिक कारणामुळे मला मुंबईत बदली द्यावी, अशी त्यांनी शासनास विनंती केली आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत राहण्यास उत्सक नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने लवकरच त्यांची बदली होणार आहे. (प्रतिनिधी)तुकाराम मुंढेंना आणण्याची मागणीपिंपरी-महापालिकेत कोणास आणायचे याबाबत स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. काम करणारा अधिकारी द्या, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रशासनास ढिलाई दिल्याने अधिकारी मुजोर झाले आहेत, त्यामुळे त्यांना वठणीवर आणावे, तसेच पारदर्शक कारभारासाठी तुकाराम मुंढेंना महापालिकेत आणावे, असे भाजपाच्या एका गटाचे म्हणने आहे. तर मुंढेंच्या नावास भाजपातील दुसऱ्या गटाचा विरोध आहे.