महाविद्यालयीन तरुणीने कालव्यात उडी मारून संपवलं जीवन; राजगुरूनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 17:48 IST2023-08-04T17:48:08+5:302023-08-04T17:48:22+5:30
डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात सोनाली गायकवाडचा मृतदेह पोलीस पाटील वंदना रासकर व ग्रामस्थांना आढळून आला

महाविद्यालयीन तरुणीने कालव्यात उडी मारून संपवलं जीवन; राजगुरूनगरमधील घटना
राजगुरुनगर: महाविद्यालयीन तरुणीने चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात अज्ञात कारणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चासकमान (ता खेड ) (दि ४ रोजी ) घडली आहे. सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४ रा.चासकमान ,ता खेड ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडील ज्ञानेश्वर बाळु गायकवाड यांनी खेड पोलिसांना फिर्याद दिली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि ४ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुमारास सोनाली गायकवाड ही घरातून राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कार्यक्रम आहे. कॉलेजला जाते असे सांगुन गेली होती. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास काळेवाडी रोडलगत गणराज मंगल कार्यालयाचे पाठीमागील बाजूस चासकमानच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात सोनाली गायकवाडचा मृतदेह पोलीस पाटील वंदना रासकर व ग्रामस्थांना आढळून आला.