शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

आचारसंहितेचा मेट्रोकडून भंग?; ब्रिजेश दीक्षित यांना नोटीस बजावण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 3:45 AM

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विस्तारीकरणाची माहिती दिल्यामुळे दीक्षित अडचणीत आले आहेत.

पुणे : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विस्तारीकरणाची माहिती दिल्यामुळे दीक्षित अडचणीत आले आहेत. जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दीक्षित यांना आचारसंहिता भंगची नोटीस बजावली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मेट्रोच्या विस्तारीकरणाची माहिती दिली. त्यात पुणे महापालिकेने स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गासाठी खर्च करण्याची तयारी दर्शविली असून या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) तातडीने अंतिम स्वरूप दिले जाईल, असे दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे वनाज ते रामवाडी दरम्यानचा मेट्रो मार्ग चांदणी चौकापर्यंत करण्याचे पत्र पुणे महापालिकेने महामेट्रोला पाठविले असल्याचेही सांगितले. मात्र, या संदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे.नवल किशोर राम म्हणाले, मेट्रोकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. परंतु, आचारसंहिता भंगाची नोटिस बजाविण्यापूर्वी याबाबत चौकशी केली जाणार आहे. चौकशीनंतरच पुढची कार्यवाहीकेली जाईल.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे