कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:36 IST2024-12-07T12:34:11+5:302024-12-07T12:36:19+5:30

या विमानाच्या प्रवाशांनी येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी याबाबत उशीरचे कारण दिले नाही.

Cochin - Pune flight delayed by almost 9 hours; Passenger inconvenience | कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय

कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय

पुणे :केरळ राज्यातील कोचीन शहरातून गुरूवारी पुण्यात येणाऱ्या विमानाला तब्बल ९ तास उशीर झाला. यामुळे प्रवाशांना कोचीन विमानतळावर वेटिंग करावे लागले. त्यातच तेथील प्रशासनाने विमानाला होत असलेल्या उशिराबाबत कारणच न दिल्यामुळे विमान प्रवासी वैतागले.

कोचीन-पुणे (विमान क्र. आय एक्स २७१४) या विमानाचे गुरूवारी उड्डाण निश्चित करण्यात होते. मात्र, विमानतळावर थांबूनही या विमानाच्या उड्डाणाबाबत बराचवेळ कोचीन विमानतळावर कोणतीही अनाउन्समेंट झाली नाही. त्यामुळे या विमानाच्या प्रवाशांनी येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी याबाबत उशीरचे कारण दिले नाही. त्यानंतर त्यांनी विमानाला उशीर होत असून, ते नऊ तास उशिराने उड्डाण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे विमान प्रवासी वैतागले. वैतागलेल्या प्रवाशांनी येथे काहीसा गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी समजूत घातली. त्यामुळे येथील वातावरण शांत झाले.

गुरूवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी या विमानाचे कोचीन येथून पुण्याकडे उड्डाण नियोजित होते आणि ते गुरूवारी सायंकाळीच ७ वाजून ५ मिनिटांनी पुणे विमानतळावर पोहोचणार होते. मात्र, या विमानाने कोचीन येथून शुक्रवारी (दि. ६) पहाटे २ वाजून ३१ मिनिटांनी पुण्याच्या दिशेने उड्डाण केले. ते पुणे विमानतळावर शुक्रवारी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी पोहोचले. यामुळे या विमानाच्या प्रवाशांना ९ तासांपेक्षा अधिक वेळ वाट पाहावी लागली. विमानामध्ये तांत्रिक बिघाड आला होता, आता प्रवासी पुणे विमानतळावर पोहोचले आहेत. मात्र, प्रवाशांना असे विमानतळावर ताटकळत बसवणे चुकीचे आहे, काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, असे हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले. 

Web Title: Cochin - Pune flight delayed by almost 9 hours; Passenger inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.