शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सीएनजी बसेसला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 8:16 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दाेन सीएनजी बसेस सुरु करण्यात आल्या असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा हाेणार आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची हाेणारी पायपीट आता थांबणार आहे. विद्यापीठात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून देणगी म्हणून मिळालेल्या सीएनजी बसेसची सेवा आजापासून सुरु करण्यात आली. ही सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहणार आहे. ही सेवा पहिल्या तीन महिन्यांसाठी प्रायाेगिक पातळीवर विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर तब्बल 411 एकर इतका आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशदारापासून मुख्य इमारतीपर्यंतचे अंतर साधारण 2 किलाेमीटर इतके आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलीच पायपीट करावी लागत हाेती. तसेच विद्यापीठात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना देखील अडचण येत हाेती. विद्यापीठाला एमएनजीएलकडून दाेन बसेस देणगी म्हणून देण्यात आल्या आहेत. या बसेस विद्यापीठात सेवा देणार आहेत. 

या बसेसचा मार्ग पुढालप्रमाणे - मुख्य प्रवेशद्वार, जैव तंत्रज्ञान विभाग, भौतिकशास्त्र विभाग, जयकर ग्रंथालय, परीक्षा विभाग, सेट / परीक्षा विभाग, प्रशासकीय इमारत, कुलगुरू कार्यालय, टपाल कार्यालय, मुलींचे वसतिगृह,  शिवाजी महाराज पुतळा, मुख्य प्रवेशद्वार.

या सेवेचा जास्तीत जास्त विद्यार्थी, प्राध्यापक व सेवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणेStudentविद्यार्थी