सातारा महामार्गावर कापडाचे रोल वाहून नेणारा ट्रक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:31 IST2018-03-20T18:31:20+5:302018-03-20T18:31:20+5:30

पुणे- सातारा महामार्गावर वरवे येथे कापडाचे रोल व केमीकल बॅरल वाहून नेणारा धावता ट्रक अचानक पाठीमागच्या बाजुने पेटल्याने जळून खाक झाला.

cloth roll carrying truck burnt on Satara highway. | सातारा महामार्गावर कापडाचे रोल वाहून नेणारा ट्रक जळून खाक

सातारा महामार्गावर कापडाचे रोल वाहून नेणारा ट्रक जळून खाक

ठळक मुद्देभिवंडी ते बेंगलोरकडे जाणारा ट्रक महामार्गावरून वरवे गाव येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला

नसरापूर : पुणे- सातारा महामार्गावर वरवे येथे कापडाचे रोल व केमीकल बॅरल वाहून नेणारा धावता ट्रक अचानक पाठीमागच्या बाजुने पेटल्याने जळून खाक झाला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर काहीवेळ महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
    राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , भिवंडी ते बेंगलोरकडे जाणारा ट्रक (क्र. के.ए -०१-ए.एफ २१२२)  हा महामार्गावरून वरवे गावच्या परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला . त्या ट्रकच्या मागुन पुढे जाणाऱ्या एका अज्ञात दुध टँकर चालकाने ट्रक पेटल्याची कल्पना दिली. त्यानंतर चालकाने अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरून बाजुला काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ट्रक चालक सय्यद खान (रा.बेंगलोर) व त्याच्या सोबतच्या सहकाऱ्याने गाडीतुन उडी मारत आपला जीव वाचवला. 
      या घटनेत पेटलेला ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाला. महामार्ग पोलीस व राजगड पोलिसांनी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या उपलब्ध करुन दिल्या. सुमारे दीड तासानंतर पेटलेला ट्रक अग्निशामक दलाच्या जवानांना विझविण्यात यश आले. 

Web Title: cloth roll carrying truck burnt on Satara highway.