शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बंद काळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:10 IST

बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजची मागणी बारामती: राज्यात सर्वत्र बुधवारी संध्याकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार ...

बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजची मागणी

बारामती: राज्यात सर्वत्र बुधवारी संध्याकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार बारामती एमआयडीसीतील विविध उद्योग चालू राहणार आहेत. या उद्योगांमध्ये काम करणारे कामगारांना कंपनीचे ओळख पत्रावर कामावर जाणे- येणेसाठी परवानगी देण्याबाबत पोलिसांना सूचना द्याव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना पत्र दिले आहे. त्यानुसार एमआयडीसीत निर्यात करणारे उद्योग व त्यांचे सप्लायर्स, व्हेंडरसह विविध मोठ्या कंपन्या, त्यांचे १५० पेक्षा व्हेंडर आहेत. याशिवाय काही अन्य उद्योग हे बंद मध्ये ही चालु राहणार आहेत.याशिवाय टेक्सटाइल पार्क व इतर मास्क बनविणारे कारखानेही सुरू राहणार आहेत.

संघटनेच्या अंदाजानुसार एमआयडीसीत ७५ टक्के कारखाने चालू राहणार आहेत .त्यामुळे या उद्योगांमध्ये काम करणारे कामगारांना कंपनीचे ओळख पत्रावर कामावर जाणे-येणेसाठी परवानगी देणेच्या पोलीस खात्याला सूचना द्याव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे.सध्याचे या करोना महामारी संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्ही सर्व प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळू तशेच प्रशासनास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन चेंबरच्या वतीने देण्यात आले आहे.