'दुकान बंद कर अन्यथा मारून टाकेल...' पुण्यात हातात कोयते घेऊन तरुणांचा धुडगुस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 09:32 IST2023-03-09T09:32:36+5:302023-03-09T09:32:48+5:30
पुण्यात कोयता गॅंगची पुन्हा दहशत सुरु झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण

'दुकान बंद कर अन्यथा मारून टाकेल...' पुण्यात हातात कोयते घेऊन तरुणांचा धुडगुस
पुणे/किरण शिंदे : पुण्यात कोयता यांचा पुन्हा एकदा धुडगूस सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यातील उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांवर आलेल्या तरुणांच्या टोळक्यानी यांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मार्ट नामक किराणा दुकान मालकावर या टोळक्याने हल्ला चढवला. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
चंद्रकांत दत्तात्रय सुतार, सुरज अर्जुन गायकवाड, राहुल रमेश धोडगे, अथर्व मारुती येनपुरे आणि आणखी दोन इसमाविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. अर्जुन कुमार जसराज प्रजापति (वय 41) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे कोंडवे धावडे परिसरात गणेश मार्ट नावाची किराणा दुकान आहे. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते दुकानात असताना आरोपी दोन दुचाकी व त्या ठिकाणी आले. त्यांनी हातातील कोयते हवेत फिरवून आम्ही या एरियातील भाई आहोत कोणी आमच्या मध्ये आले तर खल्लास करून टाकू असे बोलून परिसरात दहशत माजवली. आरोपीच्या हातातील कोयते पाहून स्थानिक नागरिक सैरावैरा पळू लागले. आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातील फ्रिजवर पेवर ब्लॉक मारून दुकान बंद कर अन्यथा मारून टाकेल अशी धमकी दिली. उत्तम नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.