शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आधी ठेकेदार ठरवायचा मग टेंडर काढायचे हा सत्ताधारी भाजपचा नवा पायंडा बंद करा; अजित पवारांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 17:13 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी याबाबत पत्र दिले आहे.

पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून प्रशासनावर दबाव आणून ५ ते ७ वर्षाचे टेंडर कालावधी घेण्याचा अट्टहास सुरु आहे. ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा पालिकेत पडला आहे. त्यामुळे आधी ठेकेदार ठरवायचा मग टेंडर काढायचे भाजपचा नवा पायंडा बंद करा अशी मागणी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी याबाबत पत्र दिले आहे. यात मुंबई महानगरपालिकेने लसीचे टेंडर मागविले असून त्यामध्ये सहभागी कंपन्यांना संपर्क करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम६७ (३)(क) चा वापर करून लस खरेदी करावी अशी मागणी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून येत असताना अशा गंभीर विषयांवर नियोजन करण्याचे सोडून पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणत खालील टेंडर प्रक्रिया राबवताना सत्ताधारी एकहाती सत्तेचे ऋण फेडत आहेत. 

पुणे महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईन व पावसाळी लाईन मधील गाळ काढायचे काम वर्षोनुवर्षे होत असून यावर्षी ७ वर्षाच्या कालावधीसाठी ३४ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरच्या अटी व शर्ती पाहता ठेकेदार आधीच ठरला आहे, ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा महानगरपालिकेत पडला आहे. तसेच सुरक्षा विभागाने ३० कोटी रकमेचे टेंडर काढले असून त्यातील अटी बघितल्या असता भाजपच्या आमदारांशी संबंधित कंपन्या यामध्ये पात्र होणार आहेत. शहरातील नदीतील जलपर्णी काढण्याबाबतची निविदा प्रक्रिया किंवा पालिकेचे ३० वाहनतळ चालविण्यास देण्याचे टेंडर पाहता सत्ताधारी सत्ताधारी पक्षाने ठेकेदारांसाठीच काम करायचे ठरवले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

पुणेकरांच्या कररूपी पैशांची विविध टेंडरच्या माध्यमातून धुळदाण उडविली जात आहे. कोरोनाच्या काळात गोंधळ घालू नंतर आपली सत्ता नाही, आपण कशासही उत्तरदायित्व नाही अशा भावनेने पुणे महानगरपालिकेत गैरव्यवहार चालू आहेत. मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जास्तीत जास्त कामे पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली आहे.

महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान बघता सर्व वादग्रस्त टेंडर स्थगित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना करावेत अशी विनंती या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस