Video : जेजुरीत भंडारा खोबरे विक्रेता आणि भाविकांमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 19:25 IST2026-02-01T19:24:51+5:302026-02-01T19:25:13+5:30

Jejuri Temple Fights Video: या प्रकारात भाविकांनी विक्रेत्याला मारहाण केल्याचा आरोप असून, त्याच्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आली.

Clash between Bhandara coconut seller and devotees in Jejuri | Video : जेजुरीत भंडारा खोबरे विक्रेता आणि भाविकांमध्ये हाणामारी

Video : जेजुरीत भंडारा खोबरे विक्रेता आणि भाविकांमध्ये हाणामारी

Jejuri Temple Rada Video: जेजुरी शहरातील नंदी चौक परिसरात भंडारा खोबरे विक्रेता आणि काही भाविकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात भाविकांनी विक्रेत्याला मारहाण केल्याचा आरोप असून, त्याच्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आली. 

वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे या घटनेनंतरही जेजुरी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

भंडारा खोबरे विक्रेते आणि भाविकांमध्ये व्यवहार करताना किरकोळ शाब्दिक वाद होण्याचे प्रकार यापूर्वीही घडत आले आहेत. मात्र, असा वाद कधीही मारहाणीपर्यंत गेलेला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदाच घडलेल्या या गंभीर घटनेमुळे जेजुरी शहरात एकच चर्चा सुरू आहे.

या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षितता आणि शिस्तीचा प्रश्नही उपस्थित केला जात असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title : जेजुरी में प्रसाद विक्रेता और श्रद्धालुओं के बीच झड़प, हाथापाई

Web Summary : जेजुरी में प्रसाद बेचने वाले विक्रेता और श्रद्धालुओं के बीच झड़प हो गई। विक्रेता ने मारपीट और दुकान में तोड़फोड़ का आरोप लगाया है। पुलिस में शिकायत दर्ज नहीं हुई है। मंदिर के पास सुरक्षा पर सवाल उठे।

Web Title : Clash Erupts Between Devotees and Vendor in Jejuri Over Offerings

Web Summary : A brawl broke out in Jejuri between devotees and a vendor selling sacred offerings. The vendor alleges assault and shop vandalism following a verbal dispute. Police haven't received a formal complaint. The incident raises concerns about safety and order near the temple.