शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शहर होणार वायफाय; मोफत सुविधा

By admin | Updated: June 18, 2015 00:10 IST

आयटी शहर म्हणून बिरुद मिळविणाऱ्या पुण्याची महापालिका लवकरच वायफाय होणार आहे. महापालिकेसह संपूर्ण शहरासाठी पालिके

पुणे : आयटी शहर म्हणून बिरुद मिळविणाऱ्या पुण्याची महापालिका लवकरच वायफाय होणार आहे. महापालिकेसह संपूर्ण शहरासाठी पालिके कडून मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठीचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प महापालिका भवन आणि पुणे स्टेशन ते विमानतळापर्यंतच्या रस्त्यावर सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्राथमिक सादरीकरण नुकतेच करण्यात आले असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र जगताप यांनी बुधवारी दिली. शहराचा समावेश ‘स्मार्ट सिटी’मध्ये करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पालिकेचा दैनंदिन कारभार ‘ई-गर्व्हनन्स’ करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. महापालिका भवनामध्ये वायफाय सुविधेसाठी या वर्षीच्या अंदाज पत्रकामध्येही निधीची तरतूद करण्यात आल्याचा मुद्दा नगरसेवक अ‍ॅड. सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थित केला होता. त्या वेळी जगताप यांनी वरील माहिती दिली. (प्रतिनिधी)दिल्लीमध्ये वायफाय सुविधा पुरविणाऱ्या एका कंपनीने नुकताच महापालिकेशी संपर्क साधला होता. महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये या कंपनीने सादरीकरणही केले आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका भवन आणि शहरातील एका प्रमुख रस्त्यावर वायफाय सुविधा पुरविण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. त्यामध्ये पुणे स्टेशन ते विमानतळापर्यंतच्या रस्त्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे, असे जगताप म्हणाले़एका दिवसाला ५० मिनिटांचे मोफत इंटरनेट -संबंधित कंपनीने या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबावर वायफायची यंत्रणा बसविण्यात येईल. या बदल्यात कंपनीच्या वतीने या खांबावर एलईडी दिवे बसविण्यात येतील.-या इंटरनेट वापरासाठी नागरिकांनी एकदा लॉगइन केल्यानंतर, दर दिवशी ५० मिनिटांपर्यंत मोफत वायफाय सुविधा वापरता येईल, असा प्रस्ताव कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे; परंतु या प्रकल्पासंदर्भात आणखी अभ्यास करून आणि संबंधित कंपनीशी चर्चा करून, अन्य कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.-पहिल्या टप्प्यातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, संपूर्ण शहरात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असेही जगताप यांनी नमूद केले. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचेही कामही संबंधित कंपनीस देण्यात आल्याचे ते म्हणाले.