शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पार्किंग महापालिका स्वत: चा चालविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 17:00 IST

खासगी ठेकेदारांकडे १ कोटी ४७ लाखांची थकबाकी

ठळक मुद्देठेकेदारांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी निर्णय

सुषमा नेहरकर-शिंदे-  

पुणे : शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मालकीची सुमारे २६ पार्किंग (वाहनतळ) आहेत. यापैकी सध्या सात पार्किंग महापालिकेच्या ताब्यात आहेत. तर अन्य पार्किंग खाजगी ठेकेदारांना चालविण्यास देण्यात आली. परंतु ठेकेदारांचा मनमानी कारभार, नागरिकांना होणारा त्रास आणि खाजगी ठेकेदारांकडे असलेली कोट्यवधी रुपायंची धकबाकी यामुळे यापुढे शहरातील सर्व पार्किंग महापालिकेकडून स्वत:च चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भांतील प्रस्ताव मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने आयुक्ता यांना दिला आहे.    नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी सार्वजनिक वाहनतळे उभारली आहेत. वाहनतळाच्या या सर्व जागा महापालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवून खाजगी ठेकेदारांना चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. परंतु महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक व मनमानी पध्दतीने पार्किंग शुल्क वसुली करणे, हाताने लिहिलेल्या पावत्या देणे, ठेकेदारांने नियुक्त केलेल्या लोकांकडून गुंडागिरी करुन नागरिकांना त्रास देणे या सारखे अनेक प्रकार सातत्याने होत आहेत. याशिवाय महापालिकेने ठेके देताना निश्चित केलेली रक्कम देखील संबंधित ठेकेदारांकडून भरली जात नाही. यामुळे बहुतेक सर्व वाहनतळांची संबंधित ठेकेदारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. याबाबत महापालिकेकडून वेळोवेळी नोटीसा देऊन देखील ठेकेदारांकडून थकबाकी दिली जात नाही.  शहरातील बहुतेक सार्वजनिक वाहनतळ ज्या ठेकेदारांना देण्यात आले त्यांना स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचा पांठिबा असतो. यामुळे महापालिकेने नोटीसा देऊन देखील थकबाकी भरण्यासाठी पुढे येत नाहीत. याउलट नोटीसा दिल्यानंतर अधिकच मनमानी पध्दतीने ठेकेदारांकडून वाहनतळांचा कारभार सुरु होतो. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने यापुढे सर्व सार्वजनिक वाहनतळे स्वत: च चालविण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भातील प्रस्ताव मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयुक्तांना दिला असल्याची माहिती विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी दिली. -------------------शहरात महापालिकेच्या मलकीचे एकूण वाहनतळे : २६खाजगी ठेकेदारांच्या ताब्यात असलेली वाहनतळे :  १८महापालिकेच्या ताब्यात असलेली वाहनतळे : ७महापालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेले वाहनतळ : १वाहनतळांकडे असलेली धकबाकी : १ कोटी ४७ लाख ३१ हजार      

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंगPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका