शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टोळीयुद्धामुळे शहर दहशतीखाली

By admin | Updated: September 23, 2014 06:57 IST

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस टोळीयुद्धाच्या घटना वाढत आहेत. यामुळे शहरवासी दहशतीखाली वावरत आहेत. विविध भागांत गुन्हेगारी टोळ्या नव्याने उदयास आल्या आहेत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस टोळीयुद्धाच्या घटना वाढत आहेत. यामुळे शहरवासी दहशतीखाली वावरत आहेत. विविध भागांत गुन्हेगारी टोळ्या नव्याने उदयास आल्या आहेत. एकीकडे ‘बेस्ट सिटी’चे पारितोषिक पटकाविणाऱ्या शहराची ओळख आता गुन्हेगारीचे शहर अशी होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा लोकांची आहे. पोलिसांनी या टोळ्यांना आणि त्यांना रसद पुरविणाऱ्यांना तथाकथित पुढाऱ्यांना हिसका दाखविण्याची वेळ आली आहे.टोळ्यांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये गुंतलेले तरुण खून, मारमाऱ्या, दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे करतात आणि या टोळीच्या नावाखाली वाहनचोरीपासून सोनसाखळ्या हिसकावण्यापर्यंतचे गुन्हे करण्यापर्यंतची ताकत इतर भुरट्या चोरट्यांची वाढली आहे.किरकोळ कारणावरुन टोळ्यांचे प्रमुख समाजात दहशत निर्माण करीत आहेत. काही महिन्यांपासून आकुर्डीत टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणात भडकले आहे. या ठिकाणी तीन टोळ्या असून, त्यांचे विविध कारणांवरून एकमेकांशी वैर आहे. तीनही टोळ्या स्थानिक असून, त्यामध्ये तरुणांची संख्याही मोठी आहे. आकुर्डी गावठाण येथे १० सप्टेंबरला सराईत गुन्हेगारांनी गोळीबार करीत दहशत माजविली. हा गोळीबार सोन्या काळभोर टोळीतील सराईत गुन्हेगारांनी केला. फरार आठ आरोपींपैकी पाच जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले, तरी या टोळीचा म्होरक्या सोन्या काळभोर व त्याचे अन्य साथीदार अद्याप फरार आहेत. गोळीबार आणि त्यानंतर माजविलेली दहशत यामुळे आकुर्डी व परिसरात नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. अशातच रविवारी रात्री पुन्हा आकुर्डीत टोळीयुद्ध भडकले. गौरव साठे या सराईत गुन्हेगारावर आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. साठे ज्या टोळीशी जोडलेला आहे, त्यांच्या विरोधी टोळीनेच हल्ला केल्याचे समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या अशा टोळीयुद्धामुळे रहिवासी दबावाखाली आहेत.भांडणाचा वचपा काढण्यासाठी नऊ ते दहा जणांनी पिस्तूल व कोयत्यासह इमारतीत शिरून दहशत माजविली. ही घटना २१ एप्रिलला पिंपरीतील मिलिंदनगर येथील विशाखा इमारतीत घडली होती. यातील आरोपीही एका टोळीशी संबंधित होते. (प्रतिनिधी)