शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीविरोधात नागरिक आंदोलनाच्या तयारीत

By admin | Updated: September 1, 2015 04:11 IST

विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्गावरील समस्यांचे निवारण न करताच या मार्गावर बसमधून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणी व प्रचंड

येरवडा : विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्गावरील समस्यांचे निवारण न करताच या मार्गावर बसमधून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणी व प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या विरोधात नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत़ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्गाचे रविवारी (दि.३०) उद्घाटन केले. त्या वेळी पवार यांनी वाहतूक सुरळीत करण्याबाबत प्रशासनाला अनेक सूचनाही केल्या. त्यापूर्वी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी भेट देऊन बीआरटीची पाहणी केली होती. त्या वेळी स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी बीआरटीबाबत सांगितलेल्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, या समस्यांचे निवारण न करताच पालिकेने उद्घाटन करून प्रवासी वाहतूक सुरू केली. यासाठी नागरिकांच्या अडचणी सोडवण्याबाबत सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. बीआरटी मार्गात अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सोय करण्यात न आल्याने ज्येष्ठ नागरिक व अपंगांना लांबवर चालण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रतीकनगर कॉर्नरवर वाहनांना रस्ता ओलांडण्याची सोय न केल्याने सर्व वाहनांना विश्रांतवाडी चौकातून वळून यावे लागत आहे. त्यामुळे वाहनांना लांबवर जावे लागत आहेच़ पण यामुळे विश्रांतवाडी चौकात प्रचंड वाहतूककोंडी होताना दिसते. याबरोबरच बीआरटीमुळे इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. पालिकेने या समस्यांकडे गांभीर्याने पाहणे जरुरीचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. या आठवडाभरात बीआरटीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण न झाल्यास पालिकेविरोधात आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादीचे विनोद पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)