शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

मंडळांनो, परवानगी हवी? मग अटी पूर्ण करा!

By admin | Updated: August 29, 2015 03:43 IST

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रस्त्यावरील मंडपासाठीच्या आकार व अन्य अटीं महापालिकेकडून आज लागू करण्यात आल्या. या अटींनुसार आता २५ फूट रुंदीच्या रस्त्यावर १० फुटांचा,

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रस्त्यावरील मंडपासाठीच्या आकार व अन्य अटीं महापालिकेकडून आज लागू करण्यात आल्या. या अटींनुसार आता २५ फूट रुंदीच्या रस्त्यावर १० फुटांचा, ५० फुट रस्त्यावर २० फुटांचा व ७० फूट रस्यावर ३० फूट रुंदीचा मंडप गणेशोत्सव मंडळांना टाकता येईल.महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या वतीने महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना आज यासंबधीचा लेखी आदेश जारी करण्यात आला. त्यात मंडपासाठीच्या अटींचा सविस्तर तपशील दिला असून, अशी परवानगी देताना मंडळांडून हमीपत्रही लिहून घ्यायचे आहे. या हमीपत्राचा नमुनाही सहायक आयुक्त कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मांडवाच्या आकाराबाबत महापालिकेने घातलेल्या निर्बंधांचे, वाहतूक शाखेच्या अटींचे काटेकोर पालन करण्यात येईल. जाहिरात फलक लावताना महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवागनी घेण्यात येईल. गणेश विसर्जनानंतर स्वखर्चाने रस्त्यावरील मंडप तसेच कमानी, जाहिरात फलक काढून टाकण्यात येतील, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरीनिशी हमीपत्रात लिहून द्यायचे आहे.महापालिकेच्या शहरातील १५ सहायक आयुक्त कार्यालयांकडून एक खिडकी योजनेंतर्गत त्यांच्या हद्दीतील मंडळांना परवानगी देण्याचे काम होईल. मंडळांनी आपापल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांकडे मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करायचा आहे. सहायक आयुक्त कार्यालयांमधील अतिक्रमण निरीक्षक, सहायक अतिक्रमण निरीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन हे अर्ज जमा करायचे आहेत. त्यानंतर त्यांनीच वाहतूक शाखा, पोलीस ठाणे व महापालिकेचे मंडपाबाबतचे प्रचलित धोरण यानुसार संबधित मंडळांना मंडपासाठी परवानगी द्यायची आहे. (प्रतिनिधी)