शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'मुलांनो मोठी अन् विकसित भारताची स्वप्ने पहा', पुण्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 16:59 IST

तुम्ही आज पाहिलेली स्वप्ने उद्या सत्यात उतरवू शकतात

शेलपिंपळगाव : भोसे (ता.खेड ) येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींची भेट घेत त्यांच्याशी साधला संवाद साधला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भोसे ते दिल्ली अशा ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. तर राष्ट्रपती भेटीसाठी राष्ट्रपती कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. 

शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य, स्पर्धा परीक्षेतील घवघवीत यश, शाळेचा १०० टक्के निकाल या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रपतींनी भेटीचे आमंत्रण प्रशालेस दिले होते. यापार्श्वभूमीवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. देशभरातून १०० शाळांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या एकमेव शाळेची निवड करण्यात आली होती. याप्रसंगी श्वेता जाधव, जानवी कुटे, समिक्षा कुटे, प्रणाली कोळी, आर्यन गांडेकर, नैतिक गायकवाड, ओंकार चितळे, शुभम गांडेकर या आठ विद्यार्थ्यांनी व चतुर पाटील, योजना कुटे, कैलास निळकंठ, हनुमंत तापकीर, रुपाली कोळेकर, शितल हिंगे, ऐश्वर्या वायभासे, रोहन सावंत या शिक्षकांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करून मनमोकळेपणाने संवाद साधला. राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा शाळेविषयी, संस्थेविषयी मोठ्या आपुलकीने विचारपूस केली. भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट अनुभवताना विद्यार्थ्यांना विलक्षण आनंद झाला.

मोठी विकसित भारताची स्वप्ने पहा - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

''बालपण हा आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा असतो. मुले ही आहेत तशी स्वतःला स्वीकारतात. यामुळेच ती चैतन्यदायी असतात. मुलांची हीच निरागसता आणि पावित्र्य आज आपण साजरे करत आहोत. मोठी स्वप्ने पहा आणि नवीन तसेच विकसित भारताची स्वप्ने पहा. आज पाहिलेली स्वप्ने उद्या सत्यात उतरवू शकतात''  

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाIndiaभारतSocialसामाजिक