शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

उन्हाळी सुट्टयातल्या शिबिरांमध्ये मुले खरंच सुरक्षित आहेत ?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 12:56 PM

शाळांची उन्हाळी सुट्टी म्हणजे शिबिरांचा हंगाम ! किंबहुना,समर कँप गेल्या काही काळात जणू स्टेटस सिंबॉलच बनू लागले आहे..

ठळक मुद्देमुलांची सुरक्षितता हाच आयोजक आणि पालक दोघांचाही प्राधान्यक्रम असायला हवानियोजनाबाबत शिबिरांचे आयोजक आणि पालक यांच्यामध्ये चर्चा सहली, साहसी खेळ यामध्ये पालकही मुलांसह सहभागी झाल्यास मुलांची काळजी घेणे सोपे

- प्रज्ञा केळकर-सिंग-   पुणे : शाळांची उन्हाळी सुट्टी म्हणजे शिबिरांचा हंगाम! मुलांना नवीन काहीतरी शिकता यावे, उपक्रमांची माहिती यावी,निसर्गाशी जवळीक साधता यावी अशा नानाविध कारणांनी पालक शिबिरांमधील मुलांच्या प्रवेशासाठी उत्सुक असतात. किंबहुना,समर कँप गेल्या काही काळात जणू स्टेटस सिंबॉलच बनू लागले आहे. उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना नव्या गोष्टी शिकता येतातच; पण मुले तेथे सुरक्षित आहेत का, साहसी खेळ, सहली, ट्रेकिंग अशा उपक्रमांच्या वेळी मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आला आहे का, याबाबत पालकांनी डोळयात तेल घालून लक्ष देणे गरजेचे असते.             मुलांची सुरक्षितता हाच आयोजक आणि पालक दोघांचाही प्राधान्यक्रम असायला हवा, असे मत व्यक्त होत आहे. प्रथमोपचार पेटी, मुलांना ठरावीक क्रमांकाचे बिल्ले लावणे, पुरेसे मदतनीस अशी काळजी घेतल्यास संभाव्य धोका टाळण्यास मदत होते.  उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना साहसी खेळ, सहली, ट्रेकिंग अशा विविध उपक्रमांना वयोगटनिहाय प्राधान्य दिले जाते. अशा वेळी योग्य काळजी न घेतल्यास मुलांना दुखापत होण्याची, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी आयोजकांकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, नियोजन कोणत्या पध्दतीने केले जात आहे, याबाबात शिबिरांचे आयोजक आणि पालक यांच्यामध्ये चर्चा होणे आवश्यक मानले जात आहे.      बालभवनच्या संचालिका शोभा भागवत म्हणाल्या, सहलीला नेल्यावर अथवा बागेत घेऊन गेल्यावर मुलांवर नियंत्रण ठेवणे ही मोठी कसरत असते. गर्दीच्या ठिकाणी मूल अनोळखी व्यक्तीबरोबर गेल्यास, दुखापत झाल्यास, दुर्घटना घडल्यास ती जबाबदारी पूर्णपणे आयोजकांची असते. मुलांना बाहेर घेऊन जाताना संभाव्य धोके लक्षात घेऊन डोळयात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. मुळात, आयोजकांनी नसते धाडस करुन मुलांना धोक्याच्या ठिकाणी घेऊन जाऊच नये. कोणताही उपक्रम मुलांच्या जिवावर बेतणार नाही, याची काळही घ्यायला हवी. मुलांची सहल आयोजित करताना बाग, ऐतिहासिक स्थळे अशी सुरक्षित ठिकाणे निवडणे आवश्यक असते. मुलांची संख्या मर्यादित असावी, तसेच तीन-चार मुलांमागे एका मदतनीसाची नेमणूक केली जावी.  सहा वर्षांच्या चिमुरड्याची आई रुपाली चव्हाण म्हणाल्या, केवळ मूल घरात बसून राहू नये म्हणून किंवा आई-वडिलांना वेळ नाही म्हणून मुलांना उन्हाळी शिबिरांना घालणे चुकीचे आहे. मुलांचा स्वभाव, क्षमता, आवड याची पालकांना पूर्ण कल्पना असते. त्यानुसारच,शिबिरांची निवड करावी. शक्य असल्यास, सहली, साहसी खेळ यामध्ये पालकही मुलांसह सहभागी झाल्यास मुलांची काळजी घेणे सोपे जाते. -------शिबिरांमध्ये मुले सुरक्षित आहेत?पूर्ण चौकशी केल्याशिवाय, शिबिरांचा उद्देश जाणून घेतल्याशिवाय आणि खात्री असल्याशिवाय शिबिराची निवड करुच नये. शिबीर आयोजकांना मुलांच्या स्वभावाची बारीकसारीक माहिती द्यावी. आयोजकांनी उपक्रमांची निवड करताना कायम जोखीम टाळावी. मुलांना मोठ्या संख्येने बाहेर घेऊन जाणे टाळले पाहिजे. ट्रेकिंगला जाताना तज्ज्ञ व्यक्ती तसेच जास्तीत जास्त मदतनीस बरोबर असावेत. प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक केलेली असावी.- वैदेही नेहरकर, शिबिर संयोजिका-----------मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय काळजी घेता येईल?- मुलांची संख्या मर्यादित असावी.- गदीर्ची वेळ, वार आणि ठिकाण टाळावे.- प्रत्येक तीन-चार मुलांमागे एक मदतनीस असावी.- मुलांना ठरावीक क्रमांकाचे बिल्ले, ओळखीची खूण लावावी.- नसते धाडस करुच नये.- पालकांचे संपर्क क्रमांक कायम सोबत बाळगावेत.- ट्रेकिंगच्या वेळी सोपी चढण निवडावी, प्रशिक्षित व्यक्ती बरोबर असाव्यात.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSummer Specialसमर स्पेशलSchoolशाळा