चिमुकलीचे नराधम बापाकडून लैंगिक शोषण; खराडी परिसरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 11:12 IST2024-01-12T11:12:23+5:302024-01-12T11:12:33+5:30

या प्रकरणी पीडितेच्या ३४ वर्षीय आईने फिर्याद दिली...

Child sexually abused by murderous father; Shocking incident in Kharadi area | चिमुकलीचे नराधम बापाकडून लैंगिक शोषण; खराडी परिसरातील धक्कादायक घटना

चिमुकलीचे नराधम बापाकडून लैंगिक शोषण; खराडी परिसरातील धक्कादायक घटना

पुणे : जन्मदात्या बापानेच साडेचार वर्षांच्या मुलीशी गैरवर्तणूक करून तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे. ही घटना खराडी परिसरात ६ जानेवारीपूर्वी आठ ते दहा दिवस आधी घडली. या प्रकरणी पीडितेच्या ३४ वर्षीय आईने फिर्याद दिली.

अधिक माहितीनुसार फिर्यादी व आरोपी पती - पत्नी असून, त्यांना साडेचार वर्षांची मुलगी आहे. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत गैरवर्तन केले. पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्याने हा प्रकार समाेर आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मुळुक करीत आहेत.

Web Title: Child sexually abused by murderous father; Shocking incident in Kharadi area