चाइल्ड पॉर्नोग्राफी : कितीही डिलिट केले तरी डिजिटल फिंगरप्रिंट कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 12:04 PM2020-02-07T12:04:00+5:302020-02-07T12:07:10+5:30

चाइल्ड पॉर्नोग्राफीचे तब्बल १७०० व्हिडीओ एकट्या महाराष्ट्रातून अपलोड

Child Pornography : The digital fingerprint remains after deleted | चाइल्ड पॉर्नोग्राफी : कितीही डिलिट केले तरी डिजिटल फिंगरप्रिंट कायम

चाइल्ड पॉर्नोग्राफी : कितीही डिलिट केले तरी डिजिटल फिंगरप्रिंट कायम

googlenewsNext
ठळक मुद्देचाइल्ड पॉर्नोग्राफीच्या डेटाने संपूर्ण देशभर खळबळ

नेहा सराफ - 
पुणे : लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अर्थात चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या डेटाने संपूर्ण देशभर खळबळ उडवली आहे. त्यातील तब्बल १७०० व्हिडीओ एकट्या महाराष्ट्रातून अपलोड झाले आहेत. त्यातील काही गुन्हेगारांना सायबर पोलिसांनी बेड्या घालून  गुन्हेही दाखल होण्यास सुरुवात केली आहे. मात्र, असे व्हिडीओ बघून डिलिट केले, हिस्ट्री क्लीअर केली तर विषय संपतो का? किंवा कोणताही फोन ट्रॅक होतो का, अशा अनेक महत्त्वाचे प्रश्न बहुतेकांच्या मनात आहेत. या प्रश्नांची उत्तरे आम्ही जाणून घेतली सायबर एक्स्पर्ट ' अर्पित दोषी ' यांच्याकडून... 

चाइल्ड पॉर्नोग्राफी किंवा कोणताही पॉर्न व्हिडीओ कोणी अपलोड केला, हे समजते का?
ल्ल व्हिडीओ कोणीही अपलोड करू शकतो, त्याला कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नसते. एखादा व्हिडीओ कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसच्या फोनवरून अपलोड केला आहे, याचा शोध लागू शकतो. तसेच एखादा व्हिडीओ कोणत्या फोनवरून शेअर झाला आहे, हेदेखील काढता येते. 
भारतात पॉर्न चाइल्ड वेबसाईट्सना बंदी असूनही काही साईट सुरू का आहेत ? 
ल्ल आपल्याकडे बहुतांश अशा साइट्सवर बंदी आहे. त्या साइट सर्च करणेही गुन्हा आहे. त्या प्रकारचा कन्टेन्ट अर्थात व्हिडीओ किंवा फोटो फोनमध्ये साठवणेही गुन्हा आहे. मात्र, काही साइट्स बाहेरच्या देशात आहेत, असे भासवून चालू ठेवतात. भारत सरकारने त्या बंद करूनही त्या चालू आहेत. 
पॉर्न डेटा डिलिट केला तरी गुन्हा सिद्ध होतो का?
ल्ल हो, हा देखील गुन्हा आहे. एकवेळ प्रत्यक्ष गुन्ह्यात पुरावा दिसणार नाही. मात्र सायबर गुन्ह्यात डिजिटल फिंगरप्रिंट म्हणजेच तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती कळते. त्यामुळे अपलोड केलेला कंटेंट गुन्हा आहे, असे समजून डिलिट केला तरीही संबंधित व्यक्ती गुन्हेगार आहे. 
इंटरनेटशिवाय चालणाºया अ‍ॅप्लिकेशनमधून पॉर्न चाइल्ड डेटा शेअर केला तर लक्षात येते का?
ल्ल हो, असे केले तरी लक्षात येते. मुळात यात इंटरनेट सुरू असताना आणि इंटरनेट बंद असताना केलेले शेअरिंग असे दोन प्रकारचे गुन्हे असतात. इंटरनेट बंद असले तरी व्यक्ती वापरत असलेल्या स्मार्ट फोनचा डेटा काढणे शक्य आहे. त्यामुळे कोणीही यातून पोलिसांना गंडवू शकत नाही. 
कोणाचाही फोन ट्रॅक होतो का?
ल्ल कोणाचाही फोन ट्रॅक शकतो. मात्र, हे फक्त पोलीस करू शकतात, बाकी कोणीही नाही. त्यामुळे कोणी मी तुला सगळी हिस्ट्री क्लीअर करून देतो म्हणत असेल तर ती फसवणूक आहे. तुम्ही इंटरनेटवर केलेली प्रत्येक कृती नोंदवली जात असते, हे कायम लक्षात ठेवा. पोलिसांनी मागितलेली माहिती संबंधित कंपनीकडून काही तासांत येते. त्यामुळे सायबर क्राइमचे प्रमाण वाढले तरी त्यात गुन्हेगार पकडण्याचे प्रमाणही वाढताना दिसते.

Web Title: Child Pornography : The digital fingerprint remains after deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.