"थोडीशी ढील दिली की लोकं गैरफायदा घेतात", दुकानांच्या वेळ वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 20:40 IST2021-08-01T20:37:41+5:302021-08-01T20:40:24+5:30

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

Chief Minister to take decision on extension of shop hours | "थोडीशी ढील दिली की लोकं गैरफायदा घेतात", दुकानांच्या वेळ वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

"थोडीशी ढील दिली की लोकं गैरफायदा घेतात", दुकानांच्या वेळ वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

ठळक मुद्दे नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजेहातावर पोट असलेल्यांना याचा अधिक त्राससमाजाच्या हिताचे, त्यांच्या जीविताचे काय याचा देखील विचार केला जाईल

पुणे : दुकानांची वेळ वाढवून द्या, अशी मागणी राज्य शासनाकडे व्यापारी वारंवार करत आहे. याबाबत गंभीरपणे चर्चा सुरू आहे. अनेक देशात लसीकरण झाले तरी देखील तेथे धोका वाढत आहे. आपण सुरुवातीपासून काळजी घेत आहोत. तिसऱ्या लाटेचा धोका आहे असे म्हंटल जातंय, नागरिकांची जीवितहानी टाळणे हे महत्वाचे आहे. थोडीशी ढिल दिली की लोक गैरफायदा घेतात. असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. 

लग्न सोहळे मोठ्या स्वरूपात होतात. नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे. टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते निर्णय घेतील. सर्वांना त्रास होत आहे. हातावर पोट असलेल्यांना याचा अधिक त्रास आहे. व्यापाऱ्यांना त्रास होतोय. पण समाजाच्या हिताचे, त्यांच्या जीविताचे काय याचा देखील विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.  

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.
  
देवेंद्र फडणवीस यांनी काय मागणी केली, माहिती घेतो...

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निकष बदलण्याची मागणी केली आहे. त्यासाठी २६ कलमी मागणी केली आहे. त्याबाबत तुम्ही निकष बदलणार का, या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी काय २६ कलमी मागणी केली आहे, याची अजून मला माहिती नाही. मात्र, फडणवीस यांनी त्यांच्या काळात या २६ कलमी मागणीत त्यातील त्यांनी किती कलमे वापरलेत हेही जनतेला सांगावे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे-जे शक्य आहे. ते आम्ही करत आहोत. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Chief Minister to take decision on extension of shop hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.