शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो बियाण्यात फसवणूक; फळधारणा होईना!

By admin | Updated: July 6, 2015 04:38 IST

टोमॅटोच्या बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. टोमॅटो पिकांवर त्यामुळे फळधारणा न होता विविध रोग येऊ लागले आहेत.

मंचर : टोमॅटोच्या बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. टोमॅटो पिकांवर त्यामुळे फळधारणा न होता विविध रोग येऊ लागले आहेत. लौकी येथील संतोष नंदाराम थोरात या शेतकऱ्याने टोमॅटो पिकात चक्क शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या आहेत. त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकाचे लागवडक्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. मागीलवर्षी टोमॅटो पिकाला मिळालेला बाजारभाव पाहता शेतकऱ्यांचा कल या वर्षी टोमॅटो पीक घेण्याकडे जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड करून मोठे भांडवल गुंतविले आहे. टोमॅटो पिकासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे टोमॅटो पीक अक्षरश: वाया गेले आहे. टोमॅटो लागवडीनंतर झाडे जोमात आली. मात्र, त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला. अक्सा, करपा, भुईडावणी या रोगांबरोबरच मूळ कुजण्याचे प्रमाण वाढले गेले. अर्थात, शेतकऱ्यांनी महागडी औषधी फवारणी केली. मात्र, बियाणेच निकृष्ट असल्यामुळे औषध फवारणी करूनही फारसा उपयोग झाला नाही. टोमॅटो झाडांना फळेच येत नाहीत, असा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. विषाणूजन्य रोगांमुळे झाडांची फुले व फळे जगत नाही. (वार्ताहर)कृषी विभागाने पंचनामे करावेतलौकी येथील शेतकरी संतोष नंदाराम थोरात यांनी २० गुंठे क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले. टोमॅटोची झाडे मोठी झाली. मात्र, फुले व फळे आलीच नाही. त्यामुळे थोरात यांनी टोमॅटोच्या शेतात शेळ््या-मेंढ्या सोडल्या आहे. त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.