शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

पुणे जिल्ह्यात परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:50 PM

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा खरेदीत फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. 

ठळक मुद्देकांदा दर स्थिर : शेतकऱ्यांमध्ये समाधान; विक्री करताना दक्षता घेण्याची गरज उत्तर पुणे जिल्ह्यात पोषक थंडी आणि निरोगी वातावरणाने कांदा चांगलामार्च सुरू झाल्यापासून या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू काही व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून शेतकऱ्यांना फसविल्याच्या घटना

राजगुरुनगर: यंदाच्या हंगामात पोषक हवामानामुळे कांदा उत्पादन उत्पादन वाढले. भाव वाढल्याने शेतकरीही समाधानी आहेत. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा खरेदीत फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. कांदा विक्री करताना अधिकृत संस्था अथवा व्यक्तींना कांदा विकून फसवणूक टाळणे गरजेचे आहे. परप्रांतीय अनेक व्यापारी उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा खरेदीत सक्रिय झाले आहेत. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसंदर्भात काळजी घेतल्यास संभाव्य आर्थिक फसवणूक टळू शकते.उत्तर पुणे जिल्ह्यात पोषक थंडी आणि निरोगी वातावरणाने कांदा चांगला पोसला आहे. त्यामुळे प्रति एकरी उत्पादन वाढले आहे. मार्च सुरू झाल्यापासून या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू झाली आहे. हा कांदा काढून झाला असून शेतकरी विक्रीस आणीत आहेत. काही शेतकरी चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कांदा चाळीत हा कांदा साठवत आहेत.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करण्याकडे काही व्यापाऱ्यांचा कल आहे. यात परप्रांतीय व्यापारी अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा काही व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून शेतकऱ्यांना फसविल्याच्या घटना घडल्या आहेत. जास्त भावाचे अमिष दाखवून, काही रक्कम आगाऊ देऊन कांदा खरेदी केला जातो. त्यानंतर तो व्यापारी पुन्हा फिरकत नाही. शेतकऱ्यांचे पैसे अशावेळी बुडतात.अवतीभोवती घडणाऱ्या या घटनांचा अनुभव पहाता शेतकऱ्यांनी  अधिकृत खरेदी करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था तसेच बाजार समित्यांचा पर्याय निवडणे गरजेचे आहे.

मध्यस्थीतर्फे एका कांदा व्यापाऱ्यास कांदा दिला. दर ठरला त्यावेळी आगाऊ रक्कम दिली. तीन दिवसांनी हा माल उचलण्यात आला. दोन दिवसात पैसे देण्याचे आश्वासन असताना हा हिंदी भाषिक व्यापारी पुन्हा फिरकला नाही. मध्यस्थांकडून आज उद्या अशी चालढकल सुरू आहे.- देवा ढगे , कांदा उत्पादक शेतकरी...........परप्रांतीय व्यापारी फसवणूक करीत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी माहितीगार व्यापाऱ्यांना माल देऊन फसवणूक टाळावी. कांद्याचा सध्याचा भाव तेजीत असला तरी वळवाचा पाऊस, येऊ घातलेला मान्सून या पार्श्वभूमीवर काही दिवसात भाव कमी होण्याचा अंदाज आहे. -संकेत वर्पे, कांदा व्यापारी

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीfraudधोकेबाजी