शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Mhada Paper Leak: म्हाडा पेपरफुटी प्रकरणी तीन जणांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:38 IST

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले

पुणे : म्हाडापरीक्षा पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र २ हजार २००  पानांचे असून, तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या साधनांमधून आरोपींविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.     पुणे सायबर पोलीसांनी संपूर्ण तपासानंतर डॉ. प्रितिश देशमुख एजंट अंकुश हरकळ , संतोष हरकळ या तिघां विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडााधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले. म्हाडा पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत एकूण सहाजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये देशमुख आणि हरकळ बंधू यांच्यासह जमाल इब्राहीम पठाण (वय-४७,रा.जळकोट,लातूर), कलीम गुलशेर खान (५२,रा.बुलढाणा), दीपक विक्रम भुसारी (३२,रा.बुलढाणा) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र तीन जणांविरूद्धच हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, आर्थिक व सायबर गुन्हे पोलिस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके व पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी हा तपास केला.

आरोग्य भरती, पोलीस भरती आणि एमपीएससी परीक्षांमधील घोटाळ्यानंतर म्हाडा अंतर्गत घेण्यात येणा-या अ,ब,क पदांच्या परीक्षांचा पेपर फुटीचा प्रयत्न झाल्याने राज्यात एकच खळ्बळ उडाली. म्हाडाच्या परीक्षांच्या नियोजनांचे कामही जी.ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि कंपनीलाच देण्यात आले होते. म्हाडा पेपर फुटी प्रकरणाच्या रँकेटची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांची पथके औरंगाबाद, बीड, जालना, पुणे, ठाणे येथे पाठविण्यात आली होती. पोलिसांचे पथक हे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवून होते. हे दोघे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांना भेटणार होते. तिथेच देशमुख हा पेनड्रायव्हमध्ये पेपर घेऊन दोघांना देणार होता. त्यांच्याकडे पेनड्रायव्हरमध्ये पेपर सापडले. दोघांना परीक्षार्थींचे पेपरसाठी फोन येत होते. या सर्वगोष्टींचे पुराव्याच्या आधारावर या पेपरफुटी प्रकरणात तिघांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

टॅग्स :mhadaम्हाडाexamपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीPoliceपोलिस