शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘अलंकार’चा अधिभार कोथरूडवरच

By admin | Updated: August 31, 2015 04:09 IST

पुणे पोलिसांच्या वतीने कोथरूड पोलीस ठाण्याची हद्द तोडून अलंकार पोलीस ठाण्याची निर्मिती केली. परंतु अलंकार पोलिसांना स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक कर्मचारी, वाहने

कोथरूड : पुणे पोलिसांच्या वतीने कोथरूड पोलीस ठाण्याची हद्द तोडून अलंकार पोलीस ठाण्याची निर्मिती केली. परंतु अलंकार पोलिसांना स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक कर्मचारी, वाहने न दिल्याने येथील अधिभार आजही कोथरूड पोलिसांवरच येत असून, अलंकार पोलीस ठाणे फक्त नाममात्रच राहिले आहे. त्यातच पोलीस चौकीच्या जागेतच पोलीस ठाण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याने जागेची फार मोठी समस्या व कर्मचारी संख्या कमी असल्याच्याही समस्या येत आहेत.सुरुवातीला अलंकार पोलीस ठाण्याला राज्य शासनाची मान्यता नसल्याने भवितव्य अंधारातच होते. कालांतराने मान्यता मिळाली. मात्र जागा नसल्याने अधिकाऱ्यांना वणवण करावी लागली. अलंकार पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी बदलीलाच प्राधान्य दिल्याने पोलीस ठाण्याची कार्यवाही लांबणीवर पडली होती. पुणे पोलीस आयुक्तांनी अलंकार पोलीस ठाण्याची कार्यवाही अलंकार चौकीच्या इमारतीतून सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर या पोलीस ठाण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली असली तरी अपुरी व्यवस्था अन् कर्मचाऱ्यांची वानवा पोलिसांनाच सहन करावी लागत आहे. पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था पुढे येत नसल्याने पोलिसांची लढाई अर्धवटच राहात आहे. अलंकार पोलीस ठाण्याच्या समस्येच्या गर्तेत कोथरूड भागातील गुन्हेगारी फोफावण्याची भीती लक्षात घेऊन ठोस उपाय करण्याची मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)