पुणे: श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त दोन दिवस शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत पुणेपोलिसांच्या वाहतूक शाखेकडून बदल करण्यात आला आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त दहीहंडी फुटेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे रस्त्यांवर कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशानुसार खालील बदल करण्यात आले आहेत.
बंडगार्डन वाहतूक विभाग...
- दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत करण्यात येणार आहेत.- तीन तोफा चौक ते ब्ल्यू नाईल चौक इस्कॉन मंदिरासमोरून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.- पर्यायी मार्ग : ब्ल्यू नाईल चौक ते तीन तोफा चौकाकडे जाणारा मार्ग हा दुतर्फा वाहतुक करण्यात येईल
कोंढवा वाहतूक विभाग...
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
- गगन उन्नती चौक येथील यू टर्न बंद करण्यात येत आहे.- केसर लॉज जवळील यू टर्न बंद करण्यात येत आहे.- खडीमशिन पोलिस चौकी ते श्रीराम चौक या रोड वरील वाहतूक बंद करण्यात येत आहे.- पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहनांनी खडी मशिन चौकातून यू टर्न घेऊन इस्कॉन मंदिराच्या पार्किंग कडे जावे व अन्य वाहनांनी इच्छित स्थळी जावे(मंतरवाडी फाटा खडीमशिन चौक कात्रज चौक दरम्यानचे मार्गावरील जड वाहतुक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.)
वानवडी वाहतूक विभाग...
१६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ ते गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
- शिवरकर रोड वरील वाहतुक बंद करण्यात येत आहे.- पर्यायी मार्ग : सदर मार्गावरील वाहनांनी संविधान चौकातून डावीकडे वळून सनग्रेस स्कुल मार्गे साळुंखे विहार रोडने इच्छित स्थळी जावे व येणारी वाहतुक त्याच रोडने येईल.- संविधान चौकाकडून उजवीकडे जाणारी वाहने ही फ्लॉवर व्हॅली लेन कडून केदारी पेट्रोल पंप पुढे इच्छित स्थळी जातील.- साळुंखे विहार रोडने येणारी वाहने संविधान चौकातून डावीकडे न वळता उजवीकडे वळून फ्लॉवर व्हॅली लेन कडून केदारी पेट्रोल पंप पुढे इच्छित स्थळी जातील.
फरासखाना व विश्रामबाग वाहतूक विभाग..
१६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ ते गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
- शिवाजी रोड वरून स्वारगेटला जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने / शास्त्री रोडने इच्छित स्थळी जावे.- पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी. रोडने इच्छित स्थळी जावे. तसेच सणस पुतळा चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जावे.- स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने -झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.- बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाईल.- रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असून पर्यायी मार्गाचा वापर करावा.- सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील.- शिवाजी रोडवरून जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक पवळे चौक जुनी साततोटी पोलिस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाईल.- गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक हि दारुवाला पूल येथून बंद राहील. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.- सोन्यामारूती चौकातून मोती चौक व फडके हौद चौकाकडे वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.विजयमारुती चौकातून उजवीकडे वळून पासोडा विठोबा मंदिर मोतीचौक डावीकडे वळून फडके हाऊस मार्गे इच्छितस्थळी जावे.
असा असेल पोलिस बंदोबस्त...
दहीहंडी निमित्त शहरात पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १० पोलिस उपायुक्त, १६ सहायक पोलिस आयुक्त, ८० पोलिस निरीक्षक, ३५० पोलिस उपनिरीक्षक आणि ३५०० पोलिस कर्मचारी हे बंदोबस्तावर हजर असणार आहेत.