शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पावसाच्या सरींची शक्यता

By admin | Updated: June 22, 2016 01:13 IST

मॉन्सूनचे शहरात आगमन झाले असले, तरी हा पाऊस प्रामुख्याने मॉन्सूनच्या उत्तर शाखेकडून येत असल्याने त्यात अद्याप जोर नाही़ शहरातील अनेक भागात मंगळवारी दिवसभरात

पुणे : मॉन्सूनचे शहरात आगमन झाले असले, तरी हा पाऊस प्रामुख्याने मॉन्सूनच्या उत्तर शाखेकडून येत असल्याने त्यात अद्याप जोर नाही़ शहरातील अनेक भागात मंगळवारी दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या़ शहराचा मध्य भाग, नगर रोड, हडपसर, पिंपरी-चिंचवड परिसरात पाऊस झाला़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत २़२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पुणे व मुंबई परिसरात पुढील काही दिवसांत अधूनमधून पावसाच्या सरी येण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ मॉॅन्सूनच्या पश्चिम शाखेची वाटचाल झाली नसली, तरी उत्तर शाखेने वेळेआधी जोरदार मुसंडी मारत थेट काश्मीरपर्यंत धडक मारली असून, संपूर्ण महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश, संपूर्ण जम्मू-काश्मीर व पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापला आहे़ कोकणात पुढील दोन-तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात मॉन्सूनला पोहोचण्यास १ जुलैपर्यंतचा काळ लागतो़ उत्तर शाखेने जोरदार मुसंडी मारल्याने मॉन्सून वेळेआधी काश्मीरमध्ये पोहोचला आहे़ गुजरात, सौराष्ट्र, पश्चिम राजस्थान या भागात दर वर्षी साधारणपणे १५ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन होते; पण मॉन्सूनच्या पश्चिम शाखेची वाटचाल गेल्या दोन दिवसांपासून थांबली असल्याने अजूनही हा सर्व परिसर पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे़ गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ मंगळवारी संपलेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक पाऊस डहाणू येथे ११६ मिमी पाऊस झाला़ ठाणे ११३, मुंबई, काणकोण ११० मिमी, भांडुप, मार्मागोवा, मुरगाव येथे प्रत्येकी १०० मिमी पावसाची नोंद झाली़ अलिबाग, पालघर, दाभोलीम, मडगाव, मुरुड, केपे, आष्टी, श्रीरामपूर, केज, शिरूर कासार, शेवगाव येथे चांगला पाऊस झाला़ राज्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाल्याच्या नोंदी ठिकठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्रात झाल्या आहेत़ कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २३ जूनला दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, २४ व २५ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ (प्रतिनिधी)