शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्याने दिले शासनाला आव्हान

By admin | Updated: October 14, 2016 05:26 IST

‘विमानतळ हाय हाय... विमानतळ हाय हाय...’च्या घोषणा देत राजेवाडीच्या आठ वर्षीय शेतकऱ्याच्या चिमुरड्याने ‘जमीन आमच्या मालकीची, नाही कुणाच्या बापाची... जर जबरदस्ती केली शासनाने तर

पुणे : ‘विमानतळ हाय हाय... विमानतळ हाय हाय...’च्या घोषणा देत राजेवाडीच्या आठ वर्षीय शेतकऱ्याच्या चिमुरड्याने ‘जमीन आमच्या मालकीची, नाही कुणाच्या बापाची... जर जबरदस्ती केली शासनाने तर एकजुटीने लढू अहिंसेच्या मार्गाने’ अशी भावनिक साद आंदोलकांना घालत शासनाला इशारा दिला. सध्या राज्यात मराठा क्रांती मूक मोर्चे सुरू असून, यात शेतकऱ्यांच्या मुलींनी मोर्चाचे नेतृत्व केले. भाषणेही फक्त त्यांचीच झाली. हाच कित्ता विमानतळविरोध मोर्चातही गुरुवारी दिसून आला. राजेवाडी गावातील विलास कडलक या शेतकऱ्याच्या ९ वर्षीय प्रथमेश कडलक या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे भाषण मोर्चाचे आकर्षण ठरले. प्रथमेशने शेतकऱ्यांच्या भावना आपल्या भाषणातून व्यक्त केल्या. तो म्हणाला, की पुरंदरच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र आमची वडिलोपार्जित जमीनच अधिग्रहित होणार आहे, त्याला आमचा विरोध आहे. आमचा विरोध हा राजकीय नाही तर प्रशासनाशी आहे. आम्ही अहिंसा व शांततेच्या मार्गाने हा लढा देणार आहोत. सात गावांनी ग्रामसभा घेऊन आपला विरोध असल्याचे मुख्यमंत्र्यांपासून एअरपोर्ट अथॉरिटीकडे कळविले आहे. बुहुतांश शेतकरी हा अल्पभूधारक आहे. पिढ्यानपिढ्या तो यावर गुजराण करीत आहे. १९७२च्या दुष्काळाला आम्ही सामोरे गेलो. मात्र, आमच्या जमिनींचा बाजार केला नाही. त्यानंतर पुरंदर उपसा योजना आली. यामुळे शेतकरी फळशेतीकडे वळला. याची फळं कुठं हातात येऊ लागली, तर हे विमानतळाचं भूत आमच्या डोेक्यावर आणून ठेवलं असल्याचे प्रथमेशने सांगितले.