शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
3
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
4
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
5
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
6
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
7
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
8
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
9
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
10
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
11
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
12
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
13
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
14
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
15
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
16
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
17
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
18
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
19
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
20
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे वेळेत ऊस गाळपाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 14:14 IST

पुणे जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे आगार म्हणुन ओळखले जातात.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका; अतिरीक्त ऊसाचा प्रश्न भेडसावणार

प्रशांत ननवरे-बारामती : पुणे जिल्ह्यातील २०२०-२१ चा ऊस गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना पूर्ण होत आहे.गतवर्षी गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेले कोरोनाचे संकट अद्याप देखील घोंघावत आहे. कोरोना संकटातच यंदाचा हंगाम सुरु झाला आहे. साखर कारखानदारीला यंदा अतिवृष्टीचा फटका  बसला आहे.अतिवृष्टीमुळे साखर कारखानदारी उशिरा सुरु झाली आहे.चांगल्या पर्जन्यमानामुळे ऊसपिकाची यंदा मुबलक उपलब्धता आहे.सर्वच कारखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप वेळेत उरकण्याचे तसेच कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना जाऊ नये यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे.

ऊस हे नगदी पिक मानले जाते.जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे  आगार म्हणुन ओळखले जातात. या तालुक्यांमधुन शेतकरी सुरु,पुर्वहंगामी,आडसाली ऊसाचे उत्पादन घेतात.तर काही खोडव्याचे उत्पादन घेतात.यंदा ऊस गाळपात खासगी ,तर साखर उताऱ्यात सहकारी कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र  आहे. बारामती ऍग्रो साखर कारखान्याने आतापर्यंत तब्बल ३,९४,०३० मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. त्यांचा सरासरी साखर उतारा ८.५१% आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १,७७,०५० मे.टन ऊस गाळप करत सरासरी १०.१८% चा साखर उतारा राखत बाजी मारली आहे.

पुणे जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचे आतापर्यंतचे एकुण ऊस गाळप २४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे.तर साखर उत्पादन २० लाख ३४ हजार ७३५ टन झाले आहे.कारखानानिहाय ऊस गाळप आणि साखर उतारा पुढीलप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (१,७७,०५० मे.टन) (१०.१८%), माळेगाव सहकारी साखर कारखाना (१,७५,८००मे.टन) (१०.१०%), छत्रपती सहकारी साखर कारखाना (१,५१,१०० मे.टन ) (९.४६%), निरा भिमा सहकारी साखर कारखाना (१,७१६२२ मे.टन) (उपलब्ध नाही), घोडगंगा साखर कारखाना (१,३७,५१० मे.टन) (१०.६६%), संत तुकाराम साखर कारखाना (९७,६८० मे.टन) (९.२९%), भिमाशंकर सहकारी साखर कारखाना (९४००० मे.टन) (९.६३%), बारामती अ?ॅग्रो (३,१०,८५० मे.टन) (८.५१%), दौंड शुगर (२,१२,३०० मे.टन) (९.०२%),  अनुराज शुगर्स लि. (१,२८३३० मे.टन) (९.५४%), श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (१,७७,८८१मे.टन) (९.१८%), विघ्नहर सहकारी साखर कारखाना (१,८९८७०मे.टन)(९.६०%), कर्मयोगी सहकारी साखर कारखाना २ लाख ५४०० मे.टन,(९.६०% )———————————————

 जिल्ह्यातील साखर कारखाने -१६ आतापर्यंत किती उसाचे गाळप (२४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे)—————————————अधिक गाळप करण्यासाठी सर्वच कारखाने प्रयत्नशील असतात.त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्राबाहेर जावुन ऊसाची पळवापळवी होते.पुणे जिल्ह्यातुन अहमदनगर,सोलापुर,सातारा जिल्ह्यात ऊस गाळपासाठी जातो.—————————————

 ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रतिक्रिया —

यंदा उसाचे मुबलक उत्पादन आहे .त्यामुळे उसाची तोड वेळेवर होत नाही .इंदापुर तालुक्यात सहकारी साखर कारखान्यापेक्षा खाजगी कारखान्याकडे जास्त उसाचा पुरवठा होत आहे .दराच्या तुलनेतही खाजगी कारखाने जादा दर देतात. मात्र ,खाजगी कारखाने क्रमवारीने तोड न करता पंसतीनुसार वशीलबाजीने तोडणी करतात .उसाला अतिवृष्टी नुकसानभरपाईही मिळाली नाही.

रणजित खारतोडे, कळस

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRainपाऊस