पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन रूपाली चाकणकर यांना हटविण्यात यावे. बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात आणि चाकणकर यांना समोरासमोर बसवून चौकशी करा आणि त्यांची नार्को टेस्ट करावी. तसेच त्यांना अटक झाली पाहिजे,अशी मागणी उध्दवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका ( बोट) कापून अशा पद्धतीने तंत्र-मंत्र करतात असं पीडित महिला सांगतात. सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान चाकणकर यांच्या हातावर जखम होती. हे गंभीर आहे” असेही त्यांनी सांगितले.
रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यानुसार त्यांचा व्यक्तीगत काही संबंध नाही, फक्त ट्रस्टपुरता संबंध होता असे सांगतात. मात्र चाकणकर यांनी खरात यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योतिष सांगणं वेगळं आणि तंत्र मंत्र विद्या करणं वेगळी गोष्ट आहे. काळी जादू, अघोरी विद्या अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करतात. या सगळ्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष पुढे असतात हे फार गंभीर आहे. काही पीडित महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या पीडित महिलांनी सांगितलं की, खरातांचे वडिल वारले तेव्हा चाकणकर होत्या. खरातांच्या पोरीच लग्न जमलं तेव्हा चाकणकर पुढे होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरात राहते. खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शिअल डॉक्युमेंट ते ही दोन दिवसात पुढे आणली जाईल. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटो दाखवले. हा फोटो फक्त ट्रस्टवरच्या संचालकाचा फोटो आहे का? या फोटोंवरुन खरातांशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत या तेच सांगतील. चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर तपासले पाहिजेत. त्यांचं किती वेळा, कोणत्या वेळी बोलणं झालं हे समजलं पाहिजे” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
सुनेत्रा पवार यांनी गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज
अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी त्यांचा बारामती आणि मुंबई येथील घराबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. या भाष्य करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, मुळात असं तंत्र-मंत्र केल्याने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं, यावर माझा स्वत:चा अजिबात विश्वास नाही. मात्र, ज्या पद्धतीने हे सर्व समोर येत आहे, ते पाहता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.
Web Summary : Sushma Andhare accuses Rupali Chakanakar of black magic, demanding a narco test and arrest in connection with Ashok Kharat's case. She alleges Chakanakar has family and financial ties with Kharat and that she performed black magic on Somvati Amavasya, urging Sunetra Pawar to investigate.
Web Summary : सुषमा अंधारे ने रूपाली चाकणकर पर काला जादू करने का आरोप लगाया और अशोक खरात के मामले में नार्को टेस्ट और गिरफ्तारी की मांग की। उन्होंने आरोप लगाया कि चाकणकर के खरात के साथ पारिवारिक और वित्तीय संबंध हैं और उन्होंने सोमवती अमावस्या पर काला जादू किया, सुनेत्रा पवार से जांच करने का आग्रह किया।