शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोरोनाने 'टेन्शन' वाढवलेल्या पुणे जिल्ह्याला केंद्राचा दिलासा ; ३ लाख २५ हजार लसींचा मिळाला पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 18:45 IST

पुण्यात गेले काही दिवसांपासून कोरोना लसींचा तुटवडा जाणवत होता..

पुणे: पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.तर दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम धडाक्यात सुरू आहे.परंतू, गेल्या काही दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा जाणवत होता. काही ठिकाणी लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रदीर्घ काळ रांगेत थांबून सुद्धा लस न घेताच रिकाम्या हाती माघारी जावे लागत होते. मात्र, पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

केंद्राकडून पुणे जिल्ह्यासाठी तब्बल ३ लाख २५ हजार ७८० कोविशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच आगामी २ ते ३ दिवसांत आणखी १ लाख लस दिली जाणार असल्याची माहिती आहे.

१ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सगळ्यांना सरसकट लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.त्याच पार्श्वभूमीवर पुण्याला इतक्या मोठ्या प्रमाणात कोविशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, सद्यस्थितीला बारा ते तेरा हजार इतके लसीकरण होत आहे. हा आकडा जवळपास १८ हजारांपर्यंत पोहचला होता. मात्र, लसींचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने ही संख्या पुन्हा घटली असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

गेल्या आठवड्यात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी याबाबत संपर्क करुनही लसींचे डोस योग्य प्रमाणात उपलब्ध व्हावे म्हणून संपर्क केला होता.  

केंद्राकडून बुधवारी पुण्याला ३ लाख २५ हजार ७८०, सातारा ५९ हजार ४५०, सोलापूर ३ हजार १००, सांगली २८ हजार ७५०, कोल्हापूर ९६ हजार ७८० अशा प्रमाणात कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहे. त्यात पुणे, ग्रामीणला प्रत्येकी १ लाख ४० हजार तर पिंपरीला ४५ हजार ७८० डोस मिळणार आहे. 

आजमितीला महापालिका आणि खासगी रुग्णालये अशी एकूण १०९ आणि ८ शासकीय अशी एकूण ११७  लसीकरण केंद्र आहे. आता नव्याने आणखी २२३ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेकडून केंद्राला पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास शहरातील लसीकरण केंद्राची संख्या तब्बल ३४० इतकी होईल. येत्या १ एप्रिलपासूनच ही सर्व केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामाध्यमातून दिवसाला जवळपास ७० हजार नागरिकांना लसीकरण करता येऊ शकेल एवढी सोय उपलब्ध होणार आहे.

---

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारAjit Pawarअजित पवारPrakash Javadekarप्रकाश जावडेकर