केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:15+5:302021-02-05T05:02:15+5:30

एका पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पुण्यात आले असता बाळासाहेब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. ...

The central government is behaving like Hitlerism: Balasaheb Thorat | केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात

केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात

एका पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पुण्यात आले असता बाळासाहेब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. थोरात म्हणाले, ''अण्णा हजारे ज्येष्ठ सामाजिक नेते आहेत. कोठेही अन्याय होत असताना अण्णा शांत राहतील, असे वाटत नाही. अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते आहे.'' भाजपमधील आमदारांची घरवापसीसाठी चुळबुळ सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. शेतक-यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यावरून केंद्रातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याचवेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत थोरात आणि टोपे यांनी भाष्य केले.

Web Title: The central government is behaving like Hitlerism: Balasaheb Thorat