शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Dahi Handi: आळंदीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व माऊलींचा जन्मोत्सव भक्तीभावे साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:57 IST

दरम्यान रात्री बारा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी माउलींवर पुष्पवृष्टी

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव व भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी परंपरेचे पालन करत मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. मध्यरात्री बाराच्या सुमारास 'माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय' अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर विधिवत गोकूळ पूजा पार पडली. यावेळी माऊलींच्या समाधीवर श्रीकृष्ण अवतार साकारण्यात आला.          तत्पूर्वी सोमवारी (दि. २६) पहाटे ११ ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात माउलींच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास अखंड हरिनाम सप्ताहाची गाथा - भजनाने सांगता करण्यात आली. संध्याकाळी ह.भ.प. नामदेव महाराज शास्री यांचे विणा मंडपात कीर्तन झाले. तर रात्री १० ते १२ यावेळेत मोझे सरकार यांच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. त्याचवेळी विणा मंडपात आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने गावकरी भजन सेवा करण्यात आली.

 दरम्यान रात्री बारा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी माउलींवर पुष्पवृष्टी केली. तद्नंतर 'श्रीं'ची आरती झाली. यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या वतीने गोकूळ पूजा व मानकऱ्यांना नारळ, प्रसाद वाटप करण्यात आले.‌ यावेळी विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, वेदांत चोपदार, बाळासाहेब चोपदार, ऋषीकेश आरफळकर, योगीराज कुर्‍हाडे, राहुल चिताळकर, योगेश आरु, स्वप्नील कुर्‍हाडे, ह.भ.प. बापूसाहेब मोरे, मुखेकर शास्री महाराज, वेद महाराज लोंढे आदींसह आळंदीकर ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.           दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवनिमित्त देवस्थानच्या वतीने उपवासाची खिरापत देण्यात आली. माजी सभापती डी. डी. भोसले पाटील यांनी शेंगदाण्याची उसळ व सुंठवडा तसेच आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या वतीने दिवसभरात २०० लिटर दुधाचे वाटप करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव व भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हजारो भाविकांनी दर्शनबारीतून माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. 

टॅग्स :PuneपुणेDahi HandiदहीहंडीSocialसामाजिकJanmashtamiजन्माष्टमीAlandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर