शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

‘ऑपरेशन सिंदूर'चे फोटो,व्हिडीओ डाऊनलोड करणे पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:57 IST

- पाकिस्तान भारताविरुद्ध सायबर युद्ध छेडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा सायबरतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

पुणे :भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षात दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारली असली तरी पाकिस्तानच्या ‘नापाक’ इराद्यांबद्दल सांगता येत नाही. सध्या भारत-पाकिस्तान मधल्या संघर्षाची स्थिती काय आहे? ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे? हे जाणून घेण्यासाठी भारतातील नेटिझन्स हल्ल्यांचे फोटो, व्हिडीओ, डाऊनलोड करून बघत असून, सोशल मीडियावरTasksche.exe, डान्स ऑफ द हिलरी.exe आणि ऑपरेशन सिंदूर इनसाइट्स.पीडीएफ अशा काही पेलोड्सदेखील शेअर झाल्या आहेत.

पण अशा पेलोड्स उघडल्या तर तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप्समधील डेटा हॅक होऊ शकतो. या माध्यमातून पाकिस्तान भारताविरुद्ध सायबर युद्ध छेडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा सायबरतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.पेलोड कसा पसरतो

पेलोड कायदेशीर फायलींच्या नावाखाली प्रसारित केला जात असल्याचे वृत्त आहे, विशेषतः व्हिडीओ किंवा कागदपत्रे. या फायली वारंवार .exe एक्सटेंशनसह येतात (उदा., tasksche.exe) आणि पहिल्या दृष्टिक्षेपात निरुपद्रवी दिसतात. एकदा क्लिक केल्यानंतर, ते डिव्हाइसवर कोड स्थापित करू शकतात, ज्यामुळे रिमोट ॲक्सेस आणि डेटा चोरी होऊ शकतो. पेलोड काय करू शकते ?  - बँकिंग क्रेडेन्शियल्स आणि पासवर्डसह संवेदनशील वैयक्तिक डेटा काढणे.- सिस्टम फाइल्समध्ये अनधिकृत प्रवेश मिळवणे.- संक्रमित डिव्हाइसेसचे रिमोट कंट्रोल सक्षम करणे.

सुरक्षिततेचे उपाय

- सेटिंग्ज- स्टोरेज- मीडिया ऑटो डाऊनलोड; ऑटो मीडिया डाऊनलोड बंद करावे.- मजबूत पासवर्ड वापरावे.-मल्टी फॅक्टर सत्यापन चालू करावे.- संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये.- तुमच्या महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप घ्यावे.- केवळ अधिकृत आणि परवानाकृत सॉफ्टवेअर वापरावे.

आता सर्व भारतीयांना ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे, हे जाणून घेण्याची इच्छा आहे. लोक व्हिडीओ किंवा फोटो डाऊनलोड करून बघत आहेत. सोशल मीडियावर काही पेलोड्स शेअर केल्याच्या बातम्या आहेत. जर तुम्ही हे पेलोड्स उघडले तर तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप्समधील डेटा हॅक होऊ शकतो. यासाठी अनोळखी लोकांकडून आलेले पीडीएफ, फोटो किंवा व्हिडीओ ओपन करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा एखाद्या सेलिब्रिटीजचे डीपफेक व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे अशा व्हिडीओंना बळी पडू नका. - डॉ. रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर