शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चोर म्हणून पकडला; निघाला मनोरुग्ण

By admin | Updated: July 6, 2015 04:43 IST

वेळ रात्री दहाची... निर्माण प्राईड (गुजरमळा) या इमारतीतील एका बंद फ्लॅटच्या गॅलरीत नागरिकांना एक व्यक्ती आढळून येते... चोर समजून परिसरातील नागरिक खाली येऊन गर्दी करतात

शिरूर : वेळ रात्री दहाची... निर्माण प्राईड (गुजरमळा) या इमारतीतील एका बंद फ्लॅटच्या गॅलरीत नागरिकांना एक व्यक्ती आढळून येते... चोर समजून परिसरातील नागरिक खाली येऊन गर्दी करतात... पोलिसांना पाचारण करण्यात येते... एक तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर त्याला पकडण्यात यशही मिळते... मात्र, पोलिस तपासात तो चोर नव्हे, तर माजलगाव येथून घर सोडून आलेला, काहीसे मानसिक संतुलन ढळलेला तरुण असल्याचे निष्पन्न होते.सुरान श्रीकृष्ण तिडके असे या तरुणाचे नाव. काल (४) रात्री दहाच्या सुमारास या फ्लॅटच्या गॅलरीत एक व्यक्ती आढळून आली. तिथे त्याने गॅलरीतील सायकल, कुंड्या खाली फेकल्या. हा प्रकार शेजारील फ्लॅटधारक खिडकीतून पाहत होते. या गोंधळामुळे परिसरातील नागरिक इमारतीखाली जमा झाले. पकडा, पकडा म्हणून ओरडू लागले. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर पोलीस आले. टेरेसवर जाऊन त्यांनी त्याला वर येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याच्या हातातील काठी तो पोलिसांच्या दिशेने भिरकावून अधिकाऱ्याला बोलवा, मी वरती येतो, असे म्हणत होता.एक तासभर हे नाट्य सुरू होते. अमित चव्हाण, नितीन गायकवाड, गणेश आगलावे, रवींद्र पाटमस, जनार्दन शेळके, पालवे व कोककर यांनी त्याचे लक्ष विचलित केले. दरम्यान, चव्हाण व गायकवाड यांनी टेरेसवरून गॅलरीत उडी घेऊन त्याला ताब्यात घेतले. या नाट्यमय घडामोडीने इमारतीच्या टेरेसवर, तसेच खाली नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस त्याला खाली घेऊन येत असताना दोघांनी त्याला चापटी मारल्या, मात्र पोलिसांनी त्याला नागरिकांच्या तावडीतून सहीसलामत पोलीस ठाण्यात नेले.पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्यात तो चोर नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिडके हा माजलगावचा असून, तो सहा वर्षांपूर्वी घर सोडून पळालेला आहे.मुंबई, ठाणे येथे वास्तव्यानंतर तो पुण्यात होता. एका ठेकेदाराने त्याला शिरूर येथे आणले. एका मार्बलच्या दुकानात तो कामाला लागला होता. काल तो काही गुंडांचा पिच्छा सुटावा म्हणून इमारतीत घुसला. त्याने इमारतीतील सर्व फ्लॅटधारकांचे दरवाजे जोराजोराने वाजवले व मग टेरेसवरून तो नंदकर यांच्या गॅलरीत उतरला. माजलगाव पोलीस ठाण्यात तिडकेच्या मिसिंगची तक्रार दाखल असून, त्याचे वडील श्रीकृष्ण तिडके यांना फोन करून त्याची माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तिडके याच्यावर ठाणे येथील नवपाडा व राबोडी पोलीस ठाण्यात संशयितरीत्या फिरताना आढळल्याचे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत समोर आलेले आहे. ज्या इमारतीच्या गॅलरीत तिडके आढळून आला आहे. त्या इमारतीत राहणाऱ्या लक्ष्मीनारायण सारडा यांच्या घरी तीनदा चोरी झालेली असून, सहा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याच इमारतीत राहणाऱ्या प्रदीप पोटघन यांच्या घरातही १७ तोळे सोने चोरीला गेले आहे. यामुळे तिडके हा चोरच असल्याचा नागरिकांचा संशय आहे. (वार्ताहर)