Pune: विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करत जातीवाचक शिवीगाळ; दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:34 IST2023-07-05T10:34:01+5:302023-07-05T10:34:47+5:30

गुन्हे शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Caste abuse by raping a young woman with the lure of marriage; A case has been registered against two police personnel | Pune: विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करत जातीवाचक शिवीगाळ; दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

Pune: विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करत जातीवाचक शिवीगाळ; दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

पुणे : एका तरुणीला विवाहाच्या आमिषाने तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर बलात्कार केल्याने तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका तरुणीने लष्कर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. याबाबत कादीर कलंदर शेख, समीर पटेल यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. पीडित तरुणी हिची आरोपी कादीर शेख याच्याशी तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. ॉ

शेखने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर तरुणीला लष्कर भागातील एका हाॅटेलजवळ बोलवून आरोपी कादीर शेख, समीर पटेल, दोन साथीदार आणि बुरखा परिधान केलेल्या एका महिलेने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिचा मोबाइल हिसकावून नेला, असे पीडित तरुणीने तक्रारीमध्ये सांगितले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख या करत आहेत.

Web Title: Caste abuse by raping a young woman with the lure of marriage; A case has been registered against two police personnel