शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम निबंधक कार्यालये होणार कॅशलेस

By admin | Updated: February 18, 2017 03:51 IST

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता दुय्यम निंबधक कार्यालयात पाँइट आॅफ सेल (पॉस) यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून

पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता दुय्यम निंबधक कार्यालयात पाँइट आॅफ सेल (पॉस) यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून, त्यास राज्य सरकारने मान्यतादेखील दिली आहे. त्यामुळे आता दस्त हाताळणी शुल्क डेबिट कार्डद्वारे भरता येणार आहे. नोंदणी विभागाने मुद्रांक शुल्क आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त हाताळणी शुल्क हे रोख स्वरूपात घेण्यात येते होते. केंद्र सरकारने ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त हाताळणी शुल्क स्वीकारण्यासाठी अडचणी आल्या होत्या. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना प्रतिपान २० रुपये या दराने शुल्क आकारले जाते. दस्तनोंदणी कार्यालयात कोणतेही शुल्क रोख स्वरूपात द्यायला लागू नये, यासाठी नोंदणी विभागाने हा प्रस्ताव पाठविला होता. त्यास शासनाने मान्यता दिली असून राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातही पॉस मशीन बसविण्यात येणार आहेत. राज्यात पाचशेपेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालये असून या ठिकाणी पॉस मशीन बसविल्यानंतर डेबिट कार्डद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरता येणार आहे.