शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

काजू १२०० तर बदाम ८०० रुपये किलो; राज्यात थंडीचा कडाका अन् सुकामेव्याच्या दरांचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:05 IST

सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिशाला झळ बसत असली तरी थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत

अजित घस्ते

पुणे: राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे. यंदा जगभरात बहुतांशी सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात वाढ १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सुकामेव्याचा बाजार तेजीत आहे.

मागील दोन वर्षे सातत्याने सुकामाव्याचे दर कमी होते; परंतु यंदा ग्राहकांना काही प्रमाणात सुकामेवा महाग खरेदी करावा लागत आहे. सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे; परंतु यंदा थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत.

बाजारात बदाम, खोबरे, जर्दाळू, अक्रोड, मनुका, पिस्ता, काजू, डिंक, खोबरे, जर्दाळूच्या मागणीत वाढ झाली आहे. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. यामुळे शरीराची कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात. त्यामुळे थंडीच्या काळात सुकामेव्याला मागणी वाढते, असे मार्केटयार्डातील ड्रायफुट्स व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.

थंडीत सुकामेव्याला मागणी 

 दिवाळीत थंडीची चाहूल लागताच सुकामेव्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. यामुळे शरीराची कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात.

या देशांतून आयात

- खारा पिस्ता - इराण, अमेरिका, कॅलिफोर्निया- बदाम - कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया- पिस्ता - इराण, इराक- मॉमेरोन बदाम - इराण- अक्रोड - अमेरिका, चिली, भारताच्या काही भागांतून- अंजीर - इराण, अफगाणिस्तान- बेदाणा - अफगाणिस्तान, भारत

देशांतर्गत आवक

खोबरे : तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटककाजू : गोवा, कर्नाटक, कोकण, केरळमनुके : सांगली, विजापूर, नाशिक, पंढरपूर

महाग होण्याची कारणे

- वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट- आयात होत असलेला सुकामेवा महागच येत आहे.- भारतात सुकामेव्याची वाढती मागणी- अतिउष्णता आणि अनियमित पर्जन्यमानामुळे काजूचे जागतिक उत्पादन घटले- झाडांवरून माल कमी निघाल्याने कच्चा काजूचा तुटवडा

यंदा जगभरात सततच्या वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट झाली आहे. मार्चमध्ये नवीन पीक आल्यानंतर दरात घट होईल. इराण युद्धामुळे खजूर, काळा मनुका, अंजीर, केसर, शहाजिरा दरात वाढ झाली आहे. दरात अंदाजे १५-२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. - शुभम गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड

सुकामेव्याचे प्रतिकिलोचे भाव

वस्तूचे नाव                  नोव्हेंबर २०२४                              डिसेंबर २०२४

काजू                            ५५० ते ८५०                               ८०० ते १२००

अक्रोड बी                     ८०० ते १२००                             १००० ते १५००अक्रोड (अख्खा)             ४५० ते ६००                                ६०० ते ८००

बदाम                           ५०० ते ८००                                ५०० ते ८००अंजीर                          ७०० ते १०००                             १००० ते १५००

काळे मनुके                   ३०० ते ४००                               ५०० ते ६००बेदाणा (भारतीय)            २०० ते ३००                                २०० ते ३००

खारा पिस्ता                   ७०० ते १०००                             १००० ते १५००जर्दाळू                          २०० ते ४००                                ३०० ते ५००

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नTemperatureतापमानMarketबाजारHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसाFamilyपरिवार