अधिकृत पार्किंगच्या नावाखाली खंडणी वसूल ; बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 15:18 IST2021-03-26T15:18:15+5:302021-03-26T15:18:51+5:30
नाना पेठेमध्ये नागझरी भिंतीलगत अधिकृत पार्किंग नसताना पैसे वसुली..

अधिकृत पार्किंगच्या नावाखाली खंडणी वसूल ; बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल
पुणे : नाना पेठेतील अल्पना थिएटरजवळील नागझरी भिंतीलगत बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळाच्या नावाखाली अधिकृत पार्किग नसतानाही रिक्षा आणि दुचाकी चालकांना फसवून आणि धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या आण्णा आंदेकरसह एकावर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका 24 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. आंदेकर याच्यासह सागर थोपटे (रा.नाना पेठ) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेमध्ये नागझरी भिंतीलगत अधिकृत पार्किंग नसतानाही बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळच्या नावाने अधिकृत पार्किंग असल्याचे भासवून खोटे पावती पुस्तक छापून फिर्यादीकडून दोनदा धमकी देऊन आणि दहशत पसरवून 10 रूपये शुल्क वसूल करण्यात आले. याठिकाणी दररोज 350 ते 400 रिक्षा आणि दुचाकी पार्क होतात. त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली 3500 ते 4000 हजार रूपये खंडणी स्वरूपात वसूल केले जात आहेत. अशा प्रकारे नागरिकांकडून 90 हजार ते 1 लाख रूपये खंडणीद्वारे वसूल नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोपडे करीत आहेत.
--------------------------