पुणे : काठीने मारहाण केल्याने मांजराच्या मृत्युप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 20:00 IST2022-04-09T20:00:00+5:302022-04-09T20:00:01+5:30

पुणे : मांजराला काठीने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गोखलेनगर भागात घडली. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा ...

case has been registered against a woman for killing a cat by beating it with a stick | पुणे : काठीने मारहाण केल्याने मांजराच्या मृत्युप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : काठीने मारहाण केल्याने मांजराच्या मृत्युप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : मांजराला काठीने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गोखलेनगर भागात घडली. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रशांत दत्तात्रय गाठे (वय ५३, रा. शिर्के पिठाच्या गिरणी शेजारी, गोखलेनगर) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शिल्पा नीलकंठ शिर्के (रा. शिर्के पिठाच्या गिरणीशेजारी, गोखलेनगर) या महिलेच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्के यांच्या घरात मांजर शिरल्याने शिल्पाला राग आला. तिने काठीने मांजराला मारहाण केली. मारहाणीत मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर शिर्के यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.

Web Title: case has been registered against a woman for killing a cat by beating it with a stick