Pune: दहा वर्षीय मुलीचा विनयभंग; पुण्यातील मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 13:25 IST2023-07-29T13:25:28+5:302023-07-29T13:25:54+5:30

पीडित अल्पवयीन मुलीने या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती....

case has been filed against the director of Muktangan English School in Pune for molestation | Pune: दहा वर्षीय मुलीचा विनयभंग; पुण्यातील मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

Pune: दहा वर्षीय मुलीचा विनयभंग; पुण्यातील मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शाळेच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संचालक राजेंद्र संपत कांबळे (वय 53) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीला कामावरून काढून टाकण्यात आले होते. 27 जुलै रोजी पीडित मुलगी आजीसोबत जात असताना आरोपीची कार सारसबागेजवळील सिग्नल जवळ थांबली होती. त्यावेळी पीडित मुलीच्या आजीने हात जोडून मला कामावर घ्या अशी विनंती त्याच्याकडे केली. त्यावेळी आरोपीने खिडकीतून हात बाहेर काढत फिर्यादीचा गाल ओढला, पाठीवरून हात फिरवत आजीकडे बघून नात मोठी झाली आहे यानंतर घेऊन तिला असे म्हणाला. मला भेटायला आता जमणार नाही, भेटायचे असेल तर संध्याकाळी एकटी या मी तुम्हाला संध्याकाळी टायमिंग सांगतो असे म्हणायचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: case has been filed against the director of Muktangan English School in Pune for molestation