शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

ट्रेकर्स मित्रांनो, लॉकडाऊननंतर भटकंती करताना 'अशी' घ्या काळजी..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 4:13 PM

९० दिवस घरात बसल्यानंतर अनेकांना भटकंतीसाठी बाहेर पडायचे आहे..

ठळक मुद्देतत्त्व-खुणा मागे सोडू नका।  महा अ‍ॅडव्हेचस कौन्सिलच्या मार्गदर्शक सूचना

गणेश खंडाळे- पुणे : लॉकडाऊन उठल्यानंतर अनेक जण ट्रेकिंगला जाण्यासाठी उत्सूक आहेत. ९० दिवस घरात बसल्यानंतर अनेकांना बाहेर पडायचे आहे. ट्रेकर्सना महा अ‍ॅडव्हेचस कौन्सिलने काही सूचना सांगितल्या आहेत. या सुचनांचे पालन केले तर कोरोना खेड्या पाड्यात पोहचणार नाही.त्याचबरोबर एकत्र येण्याने होणाऱ्या संसर्गापासून देखील ट्रेकर्स सुरक्षित राहतील. 

उगाच वेगळी वाट धरू नकाभटकंतीसारखे उपक्रम बऱ्याच दिवासांपासून थांबले असल्यामुळे जंगलामध्ये, जंगला नजीकची गावे, वाड्या वस्त्यांच्या जवळ मनुष्य वावर कमी झाल्याने जंगली श्वापदे मोकळेपणाने भटकत आहेत. त्यामुळे भटकंतीला जाताना ठरलेला मार्ग सोडून उगाचच वेगळी वाट धरू नका. सतत सावधचित्त आणि गटामध्ये राहा. पायथ्याच्या गावातील लोक वन्य श्वापदांविषयी सांगत असलेली माहिती व सुचनांचे पालन करा. देवळे, शाळा ठिकाणी मुक्काम टाळा कारण बरेच दिवस बंद असल्यामुळे या ठिकाणी सपटणारे प्राणी , किटक, मधमाशांचा प्रादुर्भाव असण्याची संभावना आहे. 

वैयक्तिक आरोग्य - स्वच्छते संदर्भात :थुंकीतून मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरतो म्हणून थुंकणे निषिद्ध.शौचासाठी खड्डे करावेत. वापरून झाल्यावर जंतुनाशके मिसळून मातीन भरावीत.शौचासाठी खड्डा करण्यासाठी छोटे फावेडे बाळगावे. पायवाटेवर लघवी करू नये, वाटेपासून दूर सुरक्षित अंतरावर जावे. शरीराचा कमीत कमी भाग विषाणू संसर्गाच्या संपर्कात येईल यासाठी पूर्ण अंग झाकतील असे कपडे असावेत पूर्ण बाह्यांचा शर्ट, पूर्ण लांबीची पॅन्ट, पायात बूट, डोक्यावर टोपी. रात्री झोपताना एकमेकांत ६ फूट अंतर ठेवा. किमान एकमेकांचे चेहरे जवळ येणार नाहीत यासाठी क्रॉस पद्धतीने झोपा. वारंवार थुंकवे लागते अशी व्यसने गुटका, तंबाखू, पानमसाला एकदम निषिद्ध. - डॉ. दीपा आगाशे, सहा. प्राध्यापक राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्र, बंगळुरू

 सहभागीसाठी सूचना :१- लॉकडाऊनकाळात खूप दिवस घरी राहिल्यानंतर लगेच बाहेर पडण्याआधी किमान शारीरिक क्षमता प्राप्त करा. २- आयोजकांना खरी वैद्यकीय माहिती द्या. वारंवार साबणानेने किंवा सॅनिटायझरने हात धुवा. ३ - पुरेशा प्रमाणात पाणी किंवा द्रव पदार्थांचे सेवन करा. जंक फुट टाळा. एकाच प्लेटमध्ये खाणे, एकाच बाटलीत पाणी पिणे टाळा.४-  स्वयंपाकाची भांडी स्वयंपाक करण्याअगोदर आणि नंतर गरम पाण्याने धुवा. दुसºयाची स्लिपिंग बँग वापरणे टाळा. आपले       वैयक्तिक साधने सोबत घ्या. 

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंगFortगडRainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्याforestजंगल