कारची पाठीमागून धडक; सायकलस्वार गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:41 IST2025-07-17T16:39:20+5:302025-07-17T16:41:44+5:30

अपघातानंतर पसार झालेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Car hits cyclist from behind; cyclist seriously injured, dies during treatment | कारची पाठीमागून धडक; सायकलस्वार गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

कारची पाठीमागून धडक; सायकलस्वार गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे रेल्वेस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी फरार कार चालकाविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामप्रतापसिंग महेसिंग राजावत (५२, रा. भैय्यावाडी, ताडीवाला रस्ता) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत बिनीत सिंग (४२, रा. वडाचीवाडी, उंड्री) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सिंग हे राजावत यांचे चुलतभाऊ आहेत. सायकलस्वार राजावत हे रविवारी (दि. १३) दुपारी दोनच्या सुमारास पुणे रेल्वेस्थानक परिसरातील एका पंचतारांकीत हाॅटेलसमोरुन आरटीओ चौकाकडे निघाले होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने सायकलस्वार राजावत यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी राजावत यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करित आहेत.

Web Title: Car hits cyclist from behind; cyclist seriously injured, dies during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.