Accident: मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:59 AM2021-12-09T11:59:05+5:302021-12-09T11:59:27+5:30

नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरटी बसथांब्याला चार चाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत

Car hit BRT bus stand due to drunk driver Two young men died on the spot in pune | Accident: मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Accident: मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Next

येरवडा : नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरटी बसथांब्याला चार चाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या भीषण अपघातात संकेत भुजबळ (वय 22रा. साईनगरी, चंदननगर)व त्याच्या शेजारी बसलेला ओम राहुल पवळे (वय 17, रा. किनारा सोसायटी कसबा पेठ) या दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. कारमध्ये मागे बसलेले गौरव साठे (वय 22, संभाजीनगर, वाघोली) प्रफुल अंकमनची(वय 21, रा. बिडी कामगार वसाहत,  चंदनगर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात पुण्याकडून नगरच्या दिशेने येणाऱ्या कारने मद्यधुंद चालकामुळे भरधाव वेगात येऊन बीआरटी बसथांब्याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की  कार बीआरटी बस स्टॉपच्या मध्यभागी असणाऱ्या जागेत जाऊन अडकली. या अपघातात चालक संकेत भुजबळ व त्याच्या शेजारी बसलेला राहुल पवळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले गौरव साठे, प्रफुल अंकमंची हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशन येथे अपघात करून मृत्यूस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जोगन करीत आहेत.

Web Title: Car hit BRT bus stand due to drunk driver Two young men died on the spot in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app