शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण सुटल्याने कार खडकवासला धरणात कोसळली; ३ मुलींसह आईचाही बुडून दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 19:36 IST

हे कुटुंब आपल्या चारचाकी वाहनातून पुण्याच्या दिशेने येत होते.

मार्गासनी : पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पाण्यात कोसळली. मात्र, या अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुलींचा आणि आईचा बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कार चालक वडिलांना पोहता येत असल्याने त्यांचे प्राण वाचले. 

या मृतांमध्ये वैदेही विठ्ठल भिकुले (वय ८) प्राजक्ता विठ्ठल भिकुले (वय १९) प्रणिता विठ्ठल भिकुले( वय १५) व आई अल्पना विठ्ठल भिकुले (वय ४५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.सर्व मृत तोरणागड पायथ्याच्या विहीर (ता. वेल्हे) येथील आहेत.

हे कुटुंब कारमधून पानशेत रस्त्याने पुण्याकडे येत होते. त्यावेळी माऊलाई मंदिराजवळ धरणात कार कोसळली. 

घटनेची माहिती मिळताच पानशेत पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. होमगार्ड आडके यांनी पाण्यात पडलेल्या कारचे दरवाजे तोडून तीन मुलींना मृतावस्थेत बाहेर काढले. बुडून बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले आहे. सायंकाळी उशिरा महिलेचा मृतदेह हाती लागला.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीcarकारDeathमृत्यूFamilyपरिवार