Pune: चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कारची कंटेनरला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:00 IST2023-07-12T15:58:00+5:302023-07-12T16:00:06+5:30
चाकण-शिक्रापूर रोडवरील मोहितेवाडी परिसरात हा अपघात घडला...

Pune: चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कारची कंटेनरला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
शेलपिंपळगाव (पुणे) :चाकण - शिक्रापूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातात कारचालक आणि कारमधील सहप्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. चाकण-शिक्रापूर रोडवरील मोहितेवाडी परिसरात हा अपघात घडला.
आदित्य धर्मा मेमाने (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड) व अमोल व्यंकटराव लोमटे (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रुग्णवाहिकाचालक दिनेश जोगदंड यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य मेमाने आणि त्यांचा मित्र अमोल लोमटे चाकण - शिक्रापूर रोडने कारमधून (एमएच १४ जेयु ४२४८) जात होते. आदित्यने कार वेगात चालवून समोरील कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात आदित्य आणि अमोल यांचा मृत्यू झाला.