Pune | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ कार जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 13:04 IST2023-04-01T13:03:15+5:302023-04-01T13:04:56+5:30

अचानक लागलेल्या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली...

Car burnt near Khandala tunnel on Mumbai-Pune Expressway pune latest news | Pune | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ कार जळून खाक

Pune | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ कार जळून खाक

लोणावळा (पुणे) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ गुरुवारी दुपारी एक कार अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. खंडाळा बोगदा पास करून कार काही अंतर पुढे आल्यानंतर अचानक गाडीने पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे समजताच गाडीमधील चालक व प्रवासी तत्काळ खाली उतरल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, अचानक लागलेल्या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.

कारला आग लागल्याची माहिती समजताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र, या आगीत कार जळून खाक झाली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. आग नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.

Web Title: Car burnt near Khandala tunnel on Mumbai-Pune Expressway pune latest news