बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 18:10 IST2021-12-07T18:07:24+5:302021-12-07T18:10:02+5:30
या अपघातांमध्ये त्यांच्या गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्या, त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही...

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीचा अपघात
बारामती: येथील बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या इनोवा या गाडीस आज दुपारी सासवड जेजुरी या रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात किरण गुजर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. शाळेतील विद्यार्थी रस्त्यावर आल्यानंतर समोरील गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांच्या गाडीने समोरील गाडीला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
या अपघातांमध्ये त्यांच्या गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्या, त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. गाडीचा वेग हा मर्यादित होता त्यामुळे देखील फारशी दुखापत झाली नाही. मात्र या अपघातांमध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी किरण गुजर यांच्यावर काही जबाबदारी सोपवली होती. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेची छाननी करून ते पुण्यावरून बारामतीकडे निघाले असताना सासवडपासून 8 कि.मी. अंतरावर हा अपघात घडला. सुदैवाने यामध्ये कोणालाही फारशी मोठी दुखापत झाली नाही. आपण सुखरूप असून कोणीही काळजी करू नये असे किरण गुजर यांनी नमूद केले आहे.