शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेंटकडून कारवाईची मोहिम

By admin | Updated: March 29, 2017 02:10 IST

खडकी येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत मागील सहा महिन्यांपासून अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सुरू आहे

खडकी : येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत मागील सहा महिन्यांपासून अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सुरू आहे. कारवाईत खडकीतील सुमारे ८० टक्के अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, इथून हटविण्यात आलेल्या व्यावसायिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मानाजीबाग परिसरात बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. येथील अतिक्रमण हटविण्यात पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र कुचराई करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अतिक्रमण वाढत असल्याने प्रशासनावर चहूबाजूंनी टीका होत होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून खडकी परिसरातील अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र इथून हटविण्यात आलेल्या व्यावसायिकांनी पुणे महानगरपालिका हद्द जिथून सुरू होते, त्या रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ स्वयंघोषित फळ मार्के ट तयार केले आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कारवाई करते म्हणून सर्व फळविक्रेते पुणे महापालिकेच्या हद्दीत रस्त्यावर हातगाड्या लावतात. या हातगाड्या आडव्या-तिडव्या लावल्याने वाहतूककोंडी होत असते. मात्र महापालिकेचा अतिक्रमण विभाग डोळे झाकून गप्प बसत आहे. त्यामुळे या हातगाडीधारकांचे अतिक्रमण विभागाशी आर्थिक हितसंबंध आहेत की काय, अशी शंका येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. पिंपरी-चिंचवड, येरवडा, कॅम्प, खराडी, कोरेगाव पार्क, मुंढवा, हडपसर या ठिकाणी जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र या अतिक्रमणामुळे वाहतुकीस रस्ता अपुरा पडतो व त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलीस विभागही याकडे कानाडोळा करीत असल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. (वार्ताहर)